दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९१-९२ | |||||
भारत | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १० – १४ नोव्हेंबर १९९१ | ||||
संघनायक | मोहम्मद अझरुद्दीन | क्लाइव्ह राइस | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | संजय मांजरेकर (१५८) | केप्लर वेसेल्स (२११) | |||
सर्वाधिक बळी | वेंकटपती राजू (५) | ॲलन डोनाल्ड (९) | |||
मालिकावीर | संजय मांजरेकर (भा) आणि केपलर वेसेल्स (द) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९१ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने दक्षिण आफ्रिकेवरील बंदी उठवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेची ही पहिली वहिली आंतरराष्ट्रीय मालिका होती. दक्षिण आफ्रिकेने ५ मार्च १९७० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेला कसोटी सामना हा वर्णभेदाच्या मुद्द्यावरून बहिष्कृत होण्याआधी खेळलेला शेवटचा सामना होता. तब्बल २१ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन केले. तसेच दक्षिण आफ्रिकेचा हा पहिला भारत दौरा होता आणि पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने खेळला. वर्णभेदामुळे मूलत: दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू केप्लर वेसल्स जो ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता, त्याने दक्षिण आफ्रिकेतर्फे म्हणजेच त्याच्या देशातर्फे पदार्पण केले.
भारताने पहिले दोन सामने जिंकत मालिकाविजय निश्चित केला. दक्षिण आफ्रिकेने तिसरा सामना जिंकला. हा दक्षिण आफ्रिकेचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय होता.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
१० नोव्हेंबर १९९१ धावफलक |
दक्षिण आफ्रिका १७७/८ (४७ षटके) | वि | भारत १७८/७ (४०.४ षटके) |
केप्लर वेसल्स ५० (९५) कपिल देव २/२३ (९ षटके) | सचिन तेंडुलकर ६२ (७३) ॲलन डोनाल्ड ५/२९ (८.४ षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- दक्षिण आफ्रिकेचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- दक्षिण आफ्रिकेने भारतामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- भारताने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- प्रवीण आमरे (भा), जिमी कुक, ॲलन डोनाल्ड, अँड्रु हडसन, पीटर कर्स्टन, ॲड्रायन कुइपर, ब्रायन मॅकमिलन, क्लाइव्ह राइस, डेव्ह रिचर्डसन, टिम शॉ आणि रिचर्ड स्नेल (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- याआधी ऑस्ट्रेलियातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळल्यानंतर केप्लर वेसल्स याने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१२ नोव्हेंबर १९९१ धावफलक |
भारत २२३/६ (४५ षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १८५/८ (४५ षटके) |
कृष्णम्माचारी श्रीकांत ६८ (८६) ॲलन डोनाल्ड ३/३६ (९ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- क्लिव्ह एकस्टीन, क्रेग मॅथ्यूज आणि मँडी याचाड (द.आ.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
१४ नोव्हेंबर १९९१ (दि/रा) धावफलक |
भारत २८७/४ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २८८/२ (४६.४ षटके) |
केप्लर व्हेसल्स ९० (१०५) वेंकटपती राजू १/४८ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- दक्षिण आफ्रिकेचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
- दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात भारतावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
संदर्भ आणि नोंदी
बाह्यदुवे
मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो
१९९१-९२ | १९९६-९७ | १९९९-२००० | २००४-०५ | २००५-०६ | २००७-०८ | २००९-१० | २०१५-१६ | २०१९-२० | २०२२ | २०२२-२३ |