दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२१-२२ | |||||
न्यू झीलंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १७ फेब्रुवारी – १ मार्च २०२२ | ||||
संघनायक | टॉम लॅथम | डीन एल्गार | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | कॉलिन दि ग्रँडहॉम (१८३) | काईल व्हेरेइन (१८८) | |||
सर्वाधिक बळी | मॅट हेन्री (१४) | कागिसो रबाडा (१०) | |||
मालिकावीर | मॅट हेन्री (न्यू झीलंड) |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी - मार्च २०२२ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा याच्याअंतर्गत खेळवली गेली. मूलत: वेळापत्रकात तीन ट्वेंटी२० सामन्यांचाही समावेश होता. परंतु नोव्हेंबर २०२१ मध्ये न्यू झीलंड बोर्डाने ट्वेंटी२० सामने वगळून सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. दोन्ही कसोटी सामने क्राइस्टचर्च मधील हॅगले ओव्हल येथे खेळवण्यात आले.
पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ ९५ धावांवर सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेची ही न्यू झीलंडमधील आतापर्यंतची सर्वात निचांकी धावसंख्या आहे. न्यू झीलंडने पहिली कसोटी जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. सन १९३२ नंतर प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी सामन्यात पहिल्या डावामध्ये १०० धावांच्या आत सर्वबाद झाला. डावाच्या फरकाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सर्वात मोठा पराभव होता. न्यू झीलंडने मायदेशात सन २००४ नंतर पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दमदार पुनरागमन करत दुसरी कसोटी १९८ धावांनी जिंकली आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवत न्यू झीलंडमधील अपराजित राहण्याची परंपरा कायम ठेवली.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
१११ (४१.४ षटके) टेंबा बवुमा ४१ (७३) टिम साउदी ५/३५ (१७.४ षटके) |
- नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- सारेल अर्वी आणि ग्लेंटन स्टूरमन (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : न्यू झीलंड - १२, दक्षिण आफ्रिका - ०.
२री कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | न्यूझीलंड |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : दक्षिण आफ्रिका - १२, न्यू झीलंड - ०.