दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०२२-२३ | |||||
ऑस्ट्रेलिया | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १७ डिसेंबर २०२२ – ८ जानेवारी २०२३ | ||||
संघनायक | पॅट कमिन्स | डीन एल्गार | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | स्टीव स्मिथ (२३१) | टेंबा बावुमा (१८५) | |||
सर्वाधिक बळी | पॅट कमिन्स (१२) | कागिसो रबाडा (११) | |||
मालिकावीर | डेव्हिड वॉर्नर (ऑ) |
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ डिसेंबर २०२२ आणि जानेवारी २०२३ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करत आहे.[१] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असतील.[२]
मे २०२२ मध्ये, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी सामने निश्चित केले,[३] तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका कसोटी मालिके लगेच खेळली जाणार होती.[४] तथापि, जुलै २०२२ मध्ये, दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या नवीन देशांतर्गत टी-२० लीगच्या वेळापत्रकाशी जुळत नसल्याने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली,[५] एकदिवसीय मालिका पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनली असती.[६] तीन सामन्यांसाठी सुपर लीगचे गुण सामने रद्द करून आयसीसीच्या मान्यतेनंतर ऑस्ट्रेलियाला देण्यात आले.[७][८][९]
पहिली कसोटी दोन दिवसांत संपल्यानंतर, सामना अधिकारी रिची रिचर्डसन यांच्याकडून "सरासरीपेक्षा कमी" रेटिंग आणि एक डिमेरिट पॉइंट प्राप्त करून, आयसीसीने गब्बाला मंजूरी दिली.[१०]
पथके
ऑस्ट्रेलिया[११] | दक्षिण आफ्रिका[१२] |
---|---|
२२ नोव्हेंबर २०२२ रोजी, ग्लेंटन स्टूरमनला दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून बाहेर काढण्यात आले आणि त्याच्या जागी लिझाद विल्यम्सची निवड करण्यात आली.[१३] पहिल्या कसोटीनंतर, ऑस्ट्रेलियाच्या संघात जॉश हेझलवूडने मायकेल नेसरची जागा घेतली.[१४]दुसऱ्या कसोटीनंतर,दुखापतग्रस्त कॅमेरॉन ग्रीन आणि मिचेल स्टार्कच्या जागी अॅश्टन अॅगर आणि मॅट रेनशॉ यांची निवड करण्यात आली[१५] दुसऱ्या कसोटीनंतर, ३१ डिसेंबर २०२२ रोजी, थेउनिस डि ब्रुइनला दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघातून बाहेर काढण्यात आले, कारण तो त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्मासाठी घरी परतला होता.[१६]
सराव सामना
कसोटी मालिका
१ली कसोटी
दक्षिण आफ्रिका | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- मिचेल स्टार्कचे (ऑ) कसोटीमध्ये ३०० बळी.[१७]
- ट्रॅव्हिस हेडच्या (ऑ) २००० कसोटी धावा पूर्ण.[१८]
- सामना दोन दिवसांत संपला, ऑस्ट्रेलियात असे फक्त दुसऱ्यांदा घडले. (पहिल्यांदा १९३१ मध्ये).[१९]
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा: ऑस्ट्रेलिया १२, दक्षिण आफ्रिका ०.
२री कसोटी
२६–३० डिसेंबर २०२२ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | ऑस्ट्रेलिया |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- डेव्हिड वॉर्नरचा (ऑ) १००वा कसोटी सामना.[२०] त्याच्या शंभरव्या कसोटीत शतक झळकावणारा तो दहावा क्रिकेट खेळाडू आणि दुसरा ऑस्ट्रेलियन बनला,[२१] आणि दुहेरी शतक झळकावणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन ठरला..[२२]
- कॅमेरॉन ग्रीनचे (ऑ) कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पाच बळी.[२३]
- डेव्हिड वॉर्नर कसोटी क्रिकेटमध्ये ८०० धावा पूर्ण करणारा आठवा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू ठरला. [२४][२५]
- ॲलेक्स कॅरेने पहिले कसोटी शतक झळकावले, एमसीजीवर शतक झळकावणारा तो (रॉड मार्श नंतर) दुसरा यष्टिरक्षक आणि २०१३ मध्ये ब्रॅड हॅडिन नंतर कसोटी शतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक ठरला..[२६]
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा हा २०१४ नंतर पहिला कसोटी मालिका विजय होता आणि २००५-०६ नंतर घरच्या मैदानावर पहिला विजय होता.
- पावसामुळे तिसऱ्या दिवशी १६:२२ नंतर खेळ होऊ शकला नाही.
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा: ऑस्ट्रेलिया १२, दक्षिण आफ्रिका ०.
३री कसोटी
४–८ जानेवारी २०२३ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
- पावसामुळे पहिल्या दिवशी १७:०७ नंतर आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही..[२७]
- उस्मान ख्वाजाच्या (ऑ) ४००० कसोटी धावा पूर्ण.[२८]
- स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू हेडन आणि मायकेल क्लार्कला मागे टाकून ऑस्ट्रेलियाचा चौथा सर्वाधिक कसोटी धावा करणारा खेळाडू बनला.[२९]
- स्टीव्ह स्मिथने त्याचे ३० वे कसोटी शतक झळकावले. त्याने ऑस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक शतके झळकाविणाऱ्या यादीतील तिसऱ्या क्रमांकाशी बरोबरी केली..[२९]
- विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा: ऑस्ट्रेलिया ४, दक्षिण आफ्रिका ४.
एकदिवसीय मलिका
१ला एकदिवसीय सामना
१२ जानेवारी २०२३ |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- विश्वचषक सुपर लीग गुण: ऑस्ट्रेलिया १०, दक्षिण आफ्रिका ०.
२रा एकदिवसीय सामना
१४ जानेवारी २०२३ |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- विश्वचषक सुपर लीग गुण: ऑस्ट्रेलिया १०, दक्षिण आफ्रिका ०.
३रा एकदिवसीय सामना
१७ जानेवारी २०२३ |
ऑस्ट्रेलिया | वि | दक्षिण आफ्रिका |
- विश्वचषक सुपर लीग गुण: ऑस्ट्रेलिया १०, दक्षिण आफ्रिका ०.
नोंदी
- ^ प्रत्येक कसोटीसाठी पाच दिवसांचा खेळ नियोजित असताना, पहिल्या कसोटीचा निकाल दोन दिवसांत लागला.
संदर्भयादी
- ^ "ऑस्ट्रेलियाज क्रिकेट शेड्युल इज इन्सेन असं एपिक जर्नी इज रेव्हील्ड". फॉक्स स्पोर्ट्स. २९ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२-२३ साठी ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय सामने जाहीर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाकडून उन्हाळ्याच्या व्यस्त वेळापत्रकाची घोषणा". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया मालिका रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या आशा एका धाग्याने अडकल्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांचा भविष्यातील स्पर्धा कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सीएसएची ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय मालिकेतून माघारीची घोषणा". क्रिकेट साऊथ आफ्रिका. 2022-07-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकाच्या आशांना मोठा धक्का". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "भारतावर विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वपूर्ण सुपर लीग गुण". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ Smale, Simon. "ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन दिवसात संपलेल्या पहिल्या कसोटीनंतर आयसीसीतर्फे गब्बा खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग". एबीसी न्यूझ ऑस्ट्रेलिया. ३० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "हेजलवूड आउट ॲज ऑसीज शिफ्ट फोकस तो प्रोटीज". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "क्रिकेट साऊथ आफ्रिकातर्फे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघाची घोषणा". क्रिकेट साऊथ आफ्रिका. 2022-11-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "साऊथ आफ्रिकेचा ग्लेंटन स्टूरमन ऑस्ट्रेलिया कसोटीतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑसीजने बॉक्सिंग डे ब्लॉकबस्टसाठी इलेव्हन जाहीर केले". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "अॅगर आणि रेनशॉ यांना सिडनी कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाकडून बोलावणे". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "मुलाच्या जन्मामुले दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज थेउनिस डि ब्रुइन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे". एएनआय न्यूझ (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "स्टार्कचे ट्रेडमार्क इनस्विंगरसह ३०० बळी". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "रॉक एन रोल गाब्बा येथे ऑस्ट्रेलियाकडून दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव". सुपर स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर दोन दिवसांतच कसोटी जिंकून इतिहासात नाव कोरले". द गार्डियन. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "बुल व परेड: इन्सिड द राईज ऑफ डेव्हिड वॉर्नर". क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ माल्कम, ॲलेक्स (२७ डिसेंबर २०२२). "डेव्हिड वॉर्नर १००व्या कसोटीत शतक झळकावून एलिट क्लबमध्ये सामील". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "शंभराव्या कसोटीमध्ये शतक". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "कॅमेरॉन ग्रीन स्पिक्स ऑफ चेंजिंग प्रायॉरिटीज आफ्टर टेस्ट फाईव्ह-फॉर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "डेव्हिड वॉर्नरने ८,००० कसोटी धावा पूर्ण केल्या, असे करणारा तो आठवा ऑस्ट्रेलियन ठरला". द प्रिंट. २७ डिसेंबर २०२२. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया / कसोटी सामने / सर्वाधिक धावा". ईएसपीएन क्रिकइन्फो. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ कॅमरॉन, लुईस. "पहिल्या शतकासह कॅरीचे मार्शच्या एमसीजीवरील पावलावर पाऊल". cricket.com.au. क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एससीजी कसोटीचा तिसरा दिवस पावसाने वाहून गेला". एबीसी न्यूझ (इंग्रजी भाषेत). १४ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ "उस्मान ख्वाजाने कसोटी क्रिकेटमध्ये ४ हजार धावांचा टप्पा पार केला". एएनआय न्यूझ (इंग्रजी भाषेत). १४ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.
- ^ a b Cameron, Louis. "सुपर स्मिथने प्रोटीजवर विजय मिळवला, ब्रॅडमनला मागे टाकले". cricket.com.au. क्रिकेट ऑस्ट्रेलिया. १४ जानेवारी २०२३ रोजी पाहिले.