Jump to content

दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र

दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र
स्थापना १९८६-८७
प्रकार क्षेत्रीय सांस्कृतिक केंद्र
उद्देश्य कला, हस्तकला, परंपरा आणि सांस्कृतिक वारस्याचे संरक्षण आणि प्रोत्साहन
स्थान
संकेतस्थळwww.sczcc.gov.in

दक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, हे १९८६ मध्ये स्थापित झालेल्या ७ विभागीय सांस्कृतिक क्षेत्रां मधून एक आहे. या संस्थेचे मुख्यालय मध्य भारतात असलेल्या नागपूर येथे आहे. या क्षेत्रात भाषिकदृष्ट्या वेगवेगळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगाणा, छत्तीसगढ, गोवा आणि महाराष्ट्र राज्ये आहेत. या प्रत्येक राज्यामध्ये लोक, आदिवासी, ललित कला आणि शिल्पकलांची समृद्ध परंपरा आहे. या परंपरेला समृद्ध करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी आणि बळकट करण्यासाठी हे केंद्र विविध क्रियाकलापांद्वारे प्रयत्न करतं. हे केंद्र, भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या नियंत्रणात कार्यरत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल या केंद्राचे अध्यक्ष आहेत.

भारताच्या इतर प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रे

भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रे भारताच्या विविध क्षेत्रांमध्ये सांस्कृतिक वारसा प्रोत्साहन आणि जतन करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने परिभाषित सात अतिव्यापी क्षेत्रे आहेत.[]

संदर्भ

  1. ^ "संग्रहित प्रत". रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-08-08. 2018-12-04 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)