दक्षिणेश्वर काली मंदिर
दक्षिणेश्वर काली मंदिर हे कोलकात्याच्या दक्षिणेश्वर भागात असलेले एक मोठे हिंदू मंदिर आहे. हूगळी नदीच्या पूर्व काठावर असलेल्या ह्या मंदिर प्रासादामध्ये काली देवीचे प्रमुख मंदिर तसेच शंकर व इतर देवतांची देखील मंदिरे आहेत. इ.स. १८५५ साली बांधल्या गेलेल्या ह्या मंदिरामध्ये प्रसिद्ध भारतीय योगी रामकृष्ण परमहंस ह्यांनी अनेक काळ पौरोहित्य व काली पूजन केले होते.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ
- विकिव्हॉयेज वरील दक्षिणेश्वर पर्यटन गाईड (इंग्रजी)