दंतमंजन
दंतमंजन हे दात घासण्यासाठी उपयोगात येणारे एक चूर्ण आहे. हे बहुदा कोरड्या स्वरूपात मिळते. यास दंतधावन असेही म्हणतात.
स्वरूप व घटक
दंतमंजन बनवताना वड, विजयसार, अर्क, खैर, करंज, जाई, करवीर, अर्जुन, निंब यापैकी एक किंवा अनेक वनस्पतींचा उपयोग केला जातो. औषधी चूर्णांनी बनविलेले हे मंजन पोटात गेले तरी किंवा तोंडात राहिले तरी कुठलाच त्रास होत नाही. यामुळे इतर कोणत्याही पेस्ट पेक्षा मंजन वापरणे जास्त सुरक्षित मानले जाते. मात्र काही उत्पादनात तंबाखुचा वापर केला जातो ही उत्पादने सुरक्षित नसतात.
व्यावसायिक उत्पादने
- शुभ्रा (शारंगधर फार्मा)
- नंबुद्रीज दंतधावन चूर्ण
- विको वज्रदंती
- डाबर लाल दंतमंजन
- वैद्यनाथ लाल मंजन
- सुधावन
- पतंजलीचे दंतकांति
- कामधेनूमंजन