Jump to content

थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स

थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स

सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्स (इंग्लिश: Thomas Stamford Raffles) (६ जुलै, इ.स. १७८१ - ५ जुलै, इ.स. १८२६) हा सिंगापूर शहराचा आणि लंडन प्राणिसंग्रहालयाचा संस्थापक म्हणून प्रसिद्ध पावलेला ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी होता. नेपोलियोनिक युद्धांमध्ये डच व फ्रेंच फौजांकडून इंडोनेशियातल्या जावा बेट जिंकून घेण्यात व ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यात त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

रॅफल्स हौशी लेखकही होता. जावा बेटाच्या इतिहासासंबंधी स्थानिक माहितीस्रोत गोळा करून त्याने "हिस्टरी ऑफ जावा" हा ग्रंथ लिहिला (इ.स. १८१७).