थॉमस जेफरसन
थॉमस जेफरसन | |
कार्यकाळ ४ मार्च १८०१ – ४ मार्च १८०९ | |
मागील | जॉन अॅडम्स |
---|---|
पुढील | जेम्स मॅडिसन |
जन्म | १३ एप्रिल १७४३ व्हर्जिनिया |
मृत्यू | ४ जुलै, १८२६ (वय ८३) व्हर्जिनिया, अमेरिका |
सही |
थॉमस जेफरसन (इंग्लिश: Thomas Jefferson ;) (एप्रिल १३, इ.स. १७४३ - जुलै ४, इ.स. १८२६) हे अमेरिकेचा तिसरे राष्ट्राध्यक्ष होते . ४ मार्च, इ.स. १८०१ ते ४ मार्च, इ.स. १८०९ या काळात ते अध्यक्षपदी आरूढ होते . इ.स. १७७६ साली जाहीर झालेल्या अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचाते प्रमुख लेखक होते. त्याच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत लुइझियाना संस्थानाची खरेदी, लुइस आणि क्लार्क ह्यांची अमेरिकेतल्या तत्कालीन अपरिचित अश्या दक्षिण प्रदेशाच्या शोधाची साहसी मोहीम वगैरे महत्त्वाच्या घटना घडल्या. त्याआधी जॉन अॅडम्स याच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ४ मार्च, इ.स. १७९७ ते ४ मार्च, इ.स. १८०१ या कालखंडात त्यांनी अमेरिकेचे उपाध्यक्षपदही सांभाळले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्हाइटहाउस संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- व्हर्जिनिया विद्यापीठ मुद्रणालयाचे संकेतस्थळ - थॉमस जेफरसन याचे समग्र साहित्य (इंग्लिश मजकूर)