थिबा राजवाडा
थिबा राजवाडा हा ब्रम्हदेशाच्या थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी सन १९१०मध्ये करण्यात आली. १९१६पर्यंत या राजवाड्यात ब्रम्हदेशाच्या राजाचे व राणीचे वास्तव्य होते. आता या राजवाड्यात एक प्रादेशिक वस्तुसंग्रहालय आहे. या राजवाड्यात थिबाने वापरलेल्या काही गोष्टी अजूनही जतन करून ठेवलेल्या आहेत.[१][२][३][४][५][६][७]
राजा थिबाची कहाणी सांगणारी मराठी पुस्तके
- द किंग इन एक्झाइल- द फॉल ऑफ द रॉयल फॅमिली ऑफ बर्मा (सुधा शहा), हार्पर कॉलिन्स पब्लिशर्स इंडिया, नवी दिल्ली, पृष्ठे : ४५६ (मराठीत 'हद्दपार राजा-थिबा : बर्मी घराण्याच्या अवनतीची कहाणी', अनुवादक - गिरीश जोशी)
- राजा थिबा (मधु मंगेश कर्णिक)
संदर्भ
- ^ एक अभिजात शोकांतिका[मृत दुवा] लोकसत्ता
- ^ म्यानमारचे राष्ट्राध्यक्षांची रत्नागिरीतल्या थिबा राजवाड्याला भेट[permanent dead link]
- ^ रम्य समुद्रकिनारे आणि अपूर्व खाद्ययात्रा- रत्नागिरी
- ^ ऐतिहासिक थिबा राजवाड्यात झाला ललितकलांचा संगम [permanent dead link]
- ^ थिबा राजवाड्याचे शताब्दीवर्ष[permanent dead link]
- ^ राजा थिबा
- ^ रंगून ते रत्नागिरी...[permanent dead link] भा. वि. कुलकर्णी