थिबा मिन
थिबा मिन (जानेवारी १, इ.स. १८५९ - डिसेंबर १९, इ.स. १९१६) हा आत्ताचं म्यानमार म्हणजेच पूर्वीच्या ब्रह्मदेशाचा राजा होता. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी थिबा सिंहासनावर आरूढ झाला. २९ नोव्हेंबर १८८५ रोजी तो ब्रिटिशांना शरण गेला. स्वकियांपासून पूर्णपणे अलग पाडण्यासाठी ब्रिटिशांनी त्याची थेट भारतात, रत्नागिरीला रवानगी केली. १६ एप्रिल १८८६ रोजी थिबा राजा आपल्या कुटुंबकबिल्यासह रत्नागिरीत आला. रत्नागिरीत आल्यानंतर थिबाला राजवाडा बांधून देण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. १९१६च्या डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला.[१]
संदर्भ
- ^ एक अभिजात शोकांतिका[मृत दुवा]