थम्सअप हे मुख्यत्वे भारतात विकले जाणारे शीतपेय आहे. १९७७मध्ये कोका कोला कंपनीने भारतात व्यापार बंद केल्यावर त्यांच्या कोका कोला पेयाऐवजी हे पेय भारतीय कंपनीने बाजारात आणले होते.
कोका कोला भारतात परतल्यावर त्यांनी हा ब्रँड विकत घेतला व त्याच नावाखाली विक्री सुरू ठेवली.