थकले रे नंदलाला (गाणे)
थकले थे नंदलाला
हे कवी 'ग.दि. माडगूळकर' आणि गायक व संगीतकार 'सुधीर फडके' यांच्या सहयोगातून निर्माण झालेल्या कलाकृतींपैकी एक गाणे आहे.
'जगाच्या पाठीवर' ह्या चित्रपटातील हे गीत 'आशा भोसले' ह्यांनी गायिले आहे.
बोल
नाच नाचुनी अती मी दमले थकले रे नंदलाला निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाला उपभोगाच्या शतकमलांची, कंठी घातली माला विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला अनय अनीती नुपूर पायी, कुसंगती कर ताला लोभ प्रलोभन नाणी फेकी, मजवर आला गेला स्वतःभोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला तालाचा मज तोल कळेना, सादही गोठून गेला अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला