त्वेर
त्वेर Тверь | |||
रशियामधील शहर | |||
| |||
त्वेर | |||
देश | रशिया | ||
राज्य | त्वेर ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. ११३५ | ||
क्षेत्रफळ | १५२.२ चौ. किमी (५८.८ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४४३ फूट (१३५ मी) | ||
लोकसंख्या (२०२१) | |||
- शहर | ४,२४,९६९ | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:०० (मॉस्को प्रमाणवेळ) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
त्वेर (रशियन: Тверь) हे रशिया देशाच्या त्वेर ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. त्वेर शहर रशियाच्या युरोपीय भागात मॉस्कोच्या १८० किमी वायव्येस वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०२१ साली त्वेरची लोकसंख्या सुमारे ४.२५ लाख इतकी होती. इ.स. ११३५ मध्ये स्थापन झालेले त्वेर हे रशियातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. परंतु दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीने त्वेरवर अधिपत्य मिळाल्यानंतर हे शहर उध्वस्त केले होते.
मॉस्को ते सेंट पीटर्सबर्ग दरम्यान धावणाऱ्या मॉस्को—सेंट पीटर्सबर्ग रेल्वेवरील त्वेर हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2021-11-27 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील त्वेर पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत