Jump to content

त्र्यंबक विष्णू पर्वते

त्र्यंबक विष्णू पर्वते (१९०२-१९८८) हे पहिले संपादक होते. नव्या प्रवृत्तीचे व परिस्थितीचे प्रातिनिधिक पत्र म्हणून लोकसत्ता अल्पावधीत मान्यता पावले. रामनाथ गोएंका यांच्या एक्स्प्रेस ग्रुपचे हे मराठी दैनिक. त्यांचे थोरले इंग्रजी भावंडे म्हणजे ‘इंडियन एक्स्प्रेस’ होय. लोकसत्ता सुरू झाले तेव्हा तेव्हा मुंबईत ‘नवाकाळ’ ‘लोकमान्य’‘नवशक्ती’ व ‘प्रभात’ ही दैनिके होती. ‘लोकसत्ता’चे स्वरूप त्यांच्या पेक्षाही अगदी वेगळे होते. १४ जानेवारी १९४८ रोजी दैनिक ‘लोकसत्ता’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. ऑक्टोंबर १९४८ पासून रविवारची ‘लोकसत्ता’ सुरू झाले. लोकसत्ताचा एकूण साचा इंग्रजी वृत्तपत्राचा होता. या पत्राने प्रथमपासूनच भरपूर बातम्या व नेटकी सजावट यावर भर यावर भर दिला. संपादकीय वर्गही भरपूर होता. वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्राचा वापर प्रथमपासून करण्यात आला. खपासाठी संघटीत प्रयत्न झाले. वाचकांपर्यंत लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबिण्यात आले. ‘लोकसत्ता’च्या या धडक्याचा पहिला फटका मुंबईतील ‘प्रभात’ला बसला. लोकसत्ताचे पहिले संपादक त्र्यंबक विष्णू पर्वते हे होते. बातम्या लेखादी मजकूर भरपूर छायाचित्रे अशी नीटस आखणी त्यांनी केली होती. वृत्तपत्र क्षेत्रातील त्यांचा अनुभव मोठा होता. इंदुप्रकाशचे तत्कालीन संपादक न. र. फाटक यांच्याकडून त्यांना या व्यवसायाची दीक्षा मिळाली. पण नंतर पर्वते यांनी मराठीपेक्षा इंग्रजी वृत्तपत्रात अधिक काम केले.