त्रिवट
त्रिवटला तिखट असेही म्हणतात. त्रिवट हा तराण्यापेक्षाही अवघड असा प्रकार आहे. पूर्वी ध्रुपद गायनानंतर त्रिवट गाण्याची पद्धत रूढ होती मात्र अतिशय अवघड असणारा हा गीतप्रकार अलीकडे फारच क्वचित गायला जातो. जवळ-जवळ या गीत प्रकाराचे अस्तित्व संपलेलेच आहे असे म्हणता येईल. त्रिवट हा तराण्याप्रमाणेच शब्दविहिन असा गीतप्रकार आहे. मृदंग आणि तबल्याचे बोल घेऊन विस्तार केला जातो. तराण्यासारखीच त्रिवटची गायकी मध्य लयीन आणि दृत लयीत सादर केली जाते. त्रिवट या प्रकारातील गीते सगळ्या रागांत गायली जातात आणि विविधताल त्यासाठी वापरले जातात.