त्रिपिटक
बौद्ध धर्म |
---|
त्रिपिटक (पाली : तिपिटक) हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले.
त्रिपिटक | |
---|---|
• विनयपिटक • सुत्तपिटक • •अभिधम्मपिटक • |
विविध भाषेत नाव त्रिपिटक | |
---|---|
इंग्रजी | Three Baskets |
पाली | Tipiṭaka |
संस्कृत | त्रिपिटक Tripiṭaka |
बंगाली | ত্রিপিটক |
बर्मी | साचा:My |
चीनी | 大藏经 (pinyin: Dàzàngjing) |
जपानी | 三蔵 (さんぞう) (rōmaji: sanzō) |
ख्मेर | ព្រះត្រៃបិដក |
कोरियन | 삼장 (三臧) (RR: samjang) |
सिंहला | ත්රිපිටකය |
थाई | พระไตรปิฎก |
व्हियेतनामी | Tam tạng |
तीन विभाग
- विनयपिटक (संस्कृत व पाली)
- सूत्रपिटक (संस्कृत; पाली-सुत्तपिटक)
- अभिधर्मपिटक (संस्कृत; पाली-अभिधम्मपिटक)
विनयपिटक
विनयपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात बौद्ध संघाच्या व्यवस्थेचे नियम आहेत.
१. महावग्ग
२. चुलवग्ग
३. पाराजिक
४. पाचित्तिय
५. परिवार.
सुत्तपिटक
सुत्तपिटकाचे एकूण पाच विभाग आहेत. यात गौतम बुद्धांचा उपदेश आहे.
(१) दिघ निकाय
(२) मज्झिम निकाय
(३) संयुत्त निकाय
(४) अंगुत्तर निकाय
(५) खुद्दक निकाय.
अभिधम्मपिटक
अभिधम्मपिटकाचे सात विभाग आहेत. त्यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे वैज्ञानिक विवेचन केले आहे.
१. धम्मसंगणि
२. विभंग
३. धातुकथा
४. पुग्गलपञती
५. कथावत्थु
६. यमक
७. पट्ठान.