Jump to content

त्रिनिदाद

त्रिनिदादचे स्थान

त्रिनिदाद (Trinidad) हे त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाच्या दोन प्रमुख बेटांपैकी मोठे व प्रमुख बेट आहे (टोबॅगो हे दुसरे बेट). ४,७६८ चौ. किमी (१,८४१ चौ. मैल) इतके क्षेत्रफळ असलेले त्रिनिदाद बेट कॅरिबियन समुद्रात दक्षिण अमेरिकेमधील व्हेनेझुएला देशाच्या केवळ ११ किमी उत्तरेस वसले असून ते अँटिल्स द्वीपसमूहाच्या दक्षिण टोकाला स्थित आहे. त्रिनिदाद बेटाची लोकसंख्या सुमारे १३ लाख असून देशाची राजधानी पोर्ट ऑफ स्पेन ह्याच बेटावर स्थित आहे.