त्रावणकोर संस्थान
त्रावणकोर संस्थान തിരുവിതാംകൂ | ||||
| ||||
| ||||
राजधानी | त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम | |||
सर्वात मोठे शहर | त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | अंतिम राजा: राजा चिथिर थिरूनल बलराम वर्मा | |||
अधिकृत भाषा | मल्याळम | |||
इतर भाषा | तमिळ |
त्रावणकोर संस्थान हे ब्रिटिश भारतातील एक संस्थान होते.
स्थापना
त्रावणकोर संस्थानची स्थापना इ.स. १७२९ या वर्षी झाली.
राजधानी
त्रावणकोर संस्थानची राजधानी इ.स. १७९५ पर्यंत पद्मनाभपुरम होती, त्यानंतर त्रिवेंद्रम किंवा तिरुवनंतपुरम हीच कायमची राजधानी होती.
संस्थानिक
त्रावणकोर संस्थानचे संस्थानिक वर्मा घराणे होते. प्रसिद्ध भारतीय चित्रकार राजा रवी वर्मा हे त्रावणकोरच्या राजघराण्यातीलाच होते.
चतुःसीमा
त्रावणकोर संस्थानाच्या उत्तरेला आणि पूर्वेला मद्रास प्रांत होता. तर पश्चिमेला अरबी समुद्र, आणि दक्षिणेला हिंदी महासागर होता.
क्षेत्रफळ
त्रावणकोर संस्थानचे क्षेत्रफळ १९,८४४ चौरस किमी इतके होते.
प्रशासकीय विभाजन
त्रावणकोर संस्थानाचे चार विभाग पडले होते-
१. कोट्टायम
२. कोल्लम
३. पद्मनाभपुराम्
४. त्रिवेंद्रम्
भाषा
त्रावणकोर संस्थानात मल्याळम, तमिळ व इंग्रजी या भाषा प्रचलित होत्या.
स्वातंत्र्योत्तर कालखंड
भारत स्वतंत्र झाल्यावर महाराजा बलराम वर्मा यांनी त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. त्यानंतर त्रावणकोर संस्थान व कोचीन संस्थान यांचे मिळून त्रावणकोर-कोचीन घटक राज्य बनवण्यात आले. त्यानंतर त्रावणकोरचा कन्याकुमारी भाग हा तामिळनाडू राज्यात गेला व उर्वरित भाग हा केरळ राज्यात आहे.