Jump to content

तोस्काना

तोस्काना
Toscana
इटलीचा प्रांत
ध्वज
चिन्ह

तोस्कानाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
तोस्कानाचे इटली देशामधील स्थान
देशइटली ध्वज इटली
राजधानीफ्लोरेन्स
क्षेत्रफळ२२,९९० चौ. किमी (८,८८० चौ. मैल)
लोकसंख्या३७,०१,२४३
घनता१६१ /चौ. किमी (४२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२IT-52
संकेतस्थळhttp://www.regione.toscana.it/

तोस्काना हा इटलीच्या मध्य भागामधील एक प्रांत आहे. फ्लोरेन्स ही तोस्काना प्रांताची राजधानी आहे.

तोस्काना हे प्राचीन काळापासून इटलीतील कला, वास्तूशास्त्र इत्यादींचे माहेरघर मानले गेले आहे. इटालियन रानिसांचा उगम तोस्काना प्रांतात झाला. लिओनार्दो दा विंची व मायकलएंजेलो हे रानिसां काळातील जगप्रसिद्ध कलाकार ह्याच प्रांतातील आहेत.

कलेसोबतच तोस्कानाची वाईनदेखील जगप्रसिद्ध आहे.