Jump to content

तोमा पिकेती

तोमा पिकेती

तोमा पिकेती (इ.स. १९७१ - ) हे समाजातील आर्थिक उत्पन्न व संपत्तीच्या असमानतेचा अभ्यास करणारे एक फ्रेंच अर्थतज्ञ आहेत. ते पॅरिसमधल्या पॅरिस अर्थशास्त्र संस्थेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

त्यांचे २०१३ साली प्रकाशित झालेले पुस्तक, “ल कापिताल ओ व्हुनेउनियेम सिएक्लं” (“एकविसाव्या शतकात भांडवल”) हे पुस्तक अनेक देशांत सर्वाधिक खपाचे पुस्तक ठरले. प्रगत देशांतली आजची आर्थिक असमानता बघितली तर परिस्थिती एकोणिसाव्या शतकातल्या सारखीच आहे असे पिकेती यांचे मत आहे. त्यामुळे कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, इत्यादिंसारख्या सामाजिक विषमतेवर विचार करणाऱ्या विसाव्या शतकाच्या आधी होऊन गेलेल्या अर्थतज्ञांचे विचार आज पुन्हा बघण्यासारखे आहेत. परंतु या तत्कालीन अर्थतज्ञांकडे सामाजिक व वैयक्तिक संपत्तीची अचूक आकडेवारी नसल्यामुळे त्यांचे निष्कर्ष तर्कशुद्ध नसून पुर्वग्रहदूषित असण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अचूक आकडेवारी असलेल्या सायमन कुझनेट्स सारख्या विसाव्या शतकातल्या अर्थतज्ञांकडे बघितले तर त्यांचे निष्कर्ष मार्क्स प्रभृतींच्या उलटच नाहीत तर विसाव्या शतकातील शीत युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे वेगळ्याप्रकारे पुर्वग्रहदूषित आहेत. उदाहरणार्थ, मार्क्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत सामाजिक संपत्ती काही थोड्या व्यक्तींच्या हातात—म्हणजेच खासगी भांडवलदारांच्या हातात—येऊन विषमता वाढत जाते व शेवटी भांडवलदारी व्यवस्थाच संपुष्टात येते. याउलट कुझनेट्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत केवळ सुरुवातीस सामाजिक विषमता वाढते व काही वेळाने संपत्तीच्या देवाणघेवाणीतून साहजिकच अार्थिक समता अस्तित्वात येते. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांतल्या भांडवलावरच्या या विरोधी कल्पनांचा पिकेती यांनी एकविसाव्या शतकात भांडवल या पुस्तकात एकविसाव्या शतकासाठी उहापोह केला आहे. पिकेतींकडे अचूक आकडेवारीचा सुकाळ असल्याने आधीच्या अर्थतज्ञांच्या तुलनेत त्यांच्या निष्कर्षांना विशेष धार आहे. या विश्लेषणातून पिकेती दाखवतात की जगात आज सर्वत्र आर्थिक विषमता वाढते आहे. ही विषमता कुझनेट्स-मार्गाने घटण्याची लक्षणे नाहीत. पुस्तकाच्या शेवटी ही वाढ रोखण्यासाठी कोणती पावले उचलावीत याबद्दल काही सल्ले आहेत.

ऑक्टोबर 2021 मध्ये, थॉमस पिकेट्टीने फ्रेंच भाषिक पश्चिम आफ्रिकेतील आणि फ्रेंच भाषिक मध्य आफ्रिकेत वापरलेल्या चलनावर घोषित केले "सीएफए फ्रँकचे 2021 मध्ये बोलणे चालू ठेवणे, हे एक विसंगती आहे". सीएफए फ्रँक हे खूपच विकृत चलन आहे.