तोपेश
तोपेशचंद्र मित्र | |
---|---|
फेलूदा या मालिकेतील पात्र | |
लेखक | सत्यजित रे |
माहिती | |
टोपणनाव | तोपशे |
व्यवसाय | विद्यार्थी |
राष्ट्रीयत्व | बंगाली, भारतीय |
तळटिपा |
तोपेशचंद्र मित्र हा सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या 'फेलूदा (बंगाली: প্রদোষচন্দ্র মিত্র, ফেলুদা ; ) कादंबरीमालिकेच्या मुख्य नायकाचा प्रमुख सहकारी आहे.
सुरुवात
सत्यजित रायांच्या "फेलूदार ग्योंईंदागिरी" (फेलूदाची हेरगिरी) या लघुकथेतून तो इ.स. १९६५ साली पहिल्यांदा वाचकांसमोर अवतीर्ण झाला. सत्यजित रायांचे आजोबा, उपेंद्रकुमार राय यांनी सुरू केलेल्या संदेश या बालकुमारांच्या मासिकामधे ही कथा प्रकाशित झाली. तोपेशचा मराठीत उच्चार करायचा झाल्यास तो तपेश असा होईल.
व्यक्तिरेखा
कथांमधे वर्णल्याप्रमाणे, तोपेशचे वय साधारण १२ वर्षे आहे. सत्यजित रायांनी बनवलेल्या चित्रपटांमध्ये मात्र तो १५-१६ वर्षांचा वाटतो. तपेशला फेलूदा प्रेमाने "तोप्शे" म्हणतो. बऱ्याच कथांत तोपेश शाळेला सुट्ट्या पडल्या असे म्हणतो, त्यावरून तो शाळेत जातो असे दिसते. "शोनार केल्ला", मराठीत "सोनेरी किल्ला", कथेमधे तोपेश लालमोहन गांगुलींची पुस्तके वाचतो, असे कळते. पुढे पुढे तोपेश फेलूदाच्या कथा लिहीतो आणि प्रकाशिक करतो.
बाह्य दुवे
- "चाहत्यांचे संकेतस्थळ" (इंग्लिश व बंगाली भाषेत). 2010-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)