तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा
तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा हा काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या पूर्वेस असलेला खनिज सोने सापडणारा एक प्रदेश आहे.
स्थान
हा प्रदेश २१० किलोमीटर (१३० मैल) लांब पट्ट्यासारखा आहे. हा दक्षिण किवुपासून मनिएमापर्यंत पसरलेला आहे. [१] यातील तोंगिझा, दक्षिण किवुच्या ईशान्येल नमोया, मनिएमा, नैऋत्येस वर कमितुगा आणि लुगुष्वा येथेही खाणी आहेत. [२]
भूशास्त्र
तोंगिझा-नमोया सुवर्णपट्टा प्रोटोझोइक काळात तयार झाला होता.
हा फेलिक आणि मफिक या आग्नेय खडकांचा क्रमाने तयार झाला असावा. येथील पॉलीफेज टेक्टोनो-मेटामॉर्फिक एपिसोड्सच्या दरम्यान हायड्रोथर्मल फ्लुईड एकत्रित झाल्यामुळे अनेकवेळा तो गरम झाला असावा. यामुळे "G4" ग्रेनाइट आणि पेगमाटीटस् तयार झाले. ही प्रक्रिया होण्यासाठी मेसोप्रोटेरोझिक ते निओप्रोटेरोझिक काळ लागला असावा. [३]
शोध आणि शोषण
१९२० च्या दशकात येथे सोन्याचे साठे सापडले. [१] कामितुगा द्वारे येथे खोदकाम १९३२ साली सुरू झाले. [४] १९५५ सालापर्यंत एमजीएलचे एकूण उत्पादन ५४ टन झाले होते. [५]