Jump to content

तैवान (बेट)

तैवान
臺灣
台灣

बेटाचे स्थानपूर्व आशिया
क्षेत्रफळ ३५,९८० वर्ग कि.मी.
लोकसंख्या २,०३,४६,१७७
देशFlag of the Republic of China तैवान

तैवान (इंग्लिश: Taiwan; हिंदी: तायवान) हे प्रशांत महासागरात चीनच्या १२० किमी पूर्व दिशेला वसलेले एक बेट आहे. इ.स. १९४९ सालापासून या बेटावर चीनचे प्रजासत्ताक अर्थात तैवान ह्या देशाची सत्ता आहे. त्यामुळे ह्या देशाचा उल्लेख करण्याकरता तैवान हे नाव वापरले जाते. तैवानचे जुने नाव 'फॉर्मोसा' असे होते.

धर्म

एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.