तेल्हारा
तेल्हारा | |
जिल्हा | अकोला |
राज्य | महाराष्ट्र |
लोकसंख्या | 30500 2019 |
दूरध्वनी संकेतांक | ०७२५८ |
टपाल संकेतांक | ४४४१०८ |
वाहन संकेतांक | महा 30 |
तेल्हारा महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील शहर आहे.
तेल्हारा तालुक्यातील या शहराच्या आसपासची जमीन तापी-पूर्णा खोऱ्यातील, म्हणून काळी व कसदार जमीन येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. पाण्याची बारा महिने उपलब्धतता नसल्यामुळे शेती प्रामुख्याने कोरडवाहू.
शहरात शिवाजी हायस्कूल आहे. शिवाय, शेठ बन्सीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी ही प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा चालवते. तेल्हारा या शहरापासून ८ कि.मी. अंतरावर भांबेरी या गावी विवेक विद्या मंदिर ही शाळा व तिच्याच विज्ञान शाखेचे कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय आहे. कला व वाणिज्य शाखेच्या पदवीपर्यंतचा अभ्यासक्रमासाठी गोपाळराव खेडकर कला व वाणिज्य महाविद्यालय आहे. गावात हल्ली शिक्षण पदविका(डी.एड) व (बी.एड) शिक्षण पदवी हे अभ्यासक्रमसुद्धा सुरू झाले आहेत.
शहरातील शेगांव रोडवर दत्तवाडी आहे. तेथे दत्ताचे एक मंदिर असून येथे दर दत्तजयंतीला यात्रा भरते.
शहरातून एक पावसाळी प्रवाह असलेली गौतमा नावाची छोटी नदी वाहते. ही पूर्णा नदीची उपनदी आहे. नदीच्या प्रवाहाच्या मध्यात आणि गावाच्या दक्षिणेकडे गौतमेश्वराचे देऊळ आहे. तेथील शिवलिंग फार पुरातन आहे. गावातील लटीयाल भवानी मंदिर(भवानी पेठ) विठ्ठल मंदिर(मुख्य पेठ), दुर्गादेवी (प्रताप चौक), मारोती मंदिर (कसबा), गजानन महाराज मंदिर (वान प्रकल्प), महानुभाव पंथी कृष्ण मंदिर ( गाडेगाव रस्ता) वगैरे प्रसिद्ध आहेत.
तेल्हारा शहरापासून वीस किलोमीटरवर सातपुड्याच्या कुशीत वारी भैरवगड आहे. जिथे समर्थ रामदास स्वामींनी पंधरा फुट उंचीची हनुमानाची स्थापना केली आहे. जवळच हनुमान सागर नावाचा जलाशय असून तालुक्यातील मुख्य जलस्त्रोत आहे.