तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ
प्रकार | प्रवासी |
---|---|
स्थापना | २७ एप्रिल २०१६ | १० वर्षे, ९५ दिवस
मुख्यालय | हैदराबाद, तेलंगणा, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, तेलंगण, तमिळनाडू, छत्तीसगढ, ओडिशा |
सेवा | टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक |
निव्वळ उत्पन्न | १३.०४ कोटी (सप्टेंबर २०२१) |
मालक | तेलंगणा शासन |
कर्मचारी | ४८,३०४ (जानेवारी २०२१) |
संकेतस्थळ | https://www.tsrtc.telangana.gov.in/ |
तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (इंग्रजी तेलंगणा स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन - संक्षिप्त TSRTC) ही एक सरकारी मालकीची कॉर्पोरेशन आहे जी भारताच्या तेलंगणा राज्यात आणि तेथून बस वाहतूक सेवा चालवते. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाजन करून त्याची स्थापना करण्यात आली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, ओडिशा आणि छत्तीसगडमधील इतर अनेक भारतीय मेट्रो शहरे देखील TSRTCच्या सेवांशी जोडलेली आहेत.
तेलंगणा सरकारने २७.०४.२०१६ रोजी, रस्ता परिवहन महामंडळ कायदा, १९५० अंतर्गत तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC)ची स्थापना केली.
विभाजनानंतर, TSRTC ने ९७ डेपोमधून तेलंगणातील विविध गंतव्यस्थानांसाठी आणि आंध्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य, तामिळनाडू आणि छत्तीसगड या शेजारील राज्यांमध्ये दररोज सुमारे ९० लाख प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बसेस चालवण्यास सुरुवात केली. तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ आपली सेवा, ६८% बस ग्रामीण परिवहन आणि ३२% बस शहरी वाहतुकीसाठी पुरवत आहेत. आता, तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे ९,७३४ बसेस आणि ११ प्रदेशांद्वारे प्रशासित ९६ डेपोमधील ४८,३०४ कर्मचारी आहेत. राज्यात ३६४ बसस्थानके आहेत.[१]
अधिकृत संकेतस्थळ
चित्र दालन
- मेट्रो सेवा
- हैदराबाद सिटी मेट्रो लक्झरी वातानुकुलीत
- पुष्पक एयरपोर्ट लाइनर (इलेक्ट्रिक बस)