तृषा चेट्टी
तृषा चेट्टी (रोमन लिपी: Trisha Chetty) (जून २६, १९८८ - हयात) ही दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे. २००७ साली दक्षिण आफ्रिकन संघाकडून पदार्पण केलेल्या चेट्टीने कसोटी तसेच एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. संघातील यष्टिरक्षकाची भूमिका बजावण्याबरोबरच ती उजव्या हाताने फलंदाजी करते.