तृतीया
तृतीया ही हिंदू कालमापनातील अमावास्येनंतर तिसऱ्या दिवशी किंवा पौर्णिमेनंतर तिसऱ्या दिवशी येणारी तिथी आहे. तृतीयेला हिंदीत तीज म्हणतात. तृतीया, अष्टमी आणि त्रयोदशी ह्या तिथिसमुच्चयाला जया म्हणतात. अमावास्येनंतर येणारी शुक्ल (किंवा शुद्ध) तृतीया असते, तर पौर्णिमेनंतर येणारी तृतीया ही वद्य (किंवा कृष्ण) तृतीया असते.
काही विशेष तृतीया
- अक्षय्य तृतीया (वैशाख शुक्ल तृतीया) (हिंदीत आखा तीज)
- कजरी तीज, कज्जली तीज किंवा सतवा तीज (श्रावण वद्य तृतीया)
- गौरी तृतीया (भाद्रपद शुक्ल तृतीया) (हरितालिका तृतीया); वराह जयंती
- महाराणा प्रताप जयंती (ज्येष्ठ शुक्ल तृतीया)
- हरियाली तृतीया (श्रावण शुक्ल तृतीया)