Jump to content

तुलसीदास

संत कवी तुलसीदास

जन्मइ.स. १४९७(विक्रम संवत १५५४)
राजापूर, उत्तर प्रदेश
निर्वाणइ.स. १६२३(विक्रम संवत १६८०)
वाराणसी, उत्तर प्रदेश
उपास्यदैवतश्रीराम
संप्रदायवैष्णव
गुरूनरहरिदास
भाषाअवधी
साहित्यरचनारामचरितमानस, हनुमान चालीसा, दोहावली, इ.
संबंधित तीर्थक्षेत्रेचित्रकूट
वडीलआत्माराम दुबे
आईहुलसी दुबे
पत्नीरत्नावली
गोस्वामी तुलसीदास यांचे चित्र असलेले भारताचे पोस्टाचे तिकीट

गोस्वामी तुलसीदास हे भारतातील एक हिंदू संत कवी होते.

जन्म

तुलसीदासांचा जन्म इसवी सन १४९७ या वर्षी सध्याच्या उत्तर प्रदेश या राज्यातील चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर यथे झाला.

कार्य

तुलसीदास यांनी भारतभर भ्रमण केले. तत्कालीन हिंदु समाजावर झालेले आक्रमण पाहून ते अतिशय दुःखी झाले. त्यानी भारतातील सर्व राजांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. पण हे प्रयत्न सफल झाले नाहीत. तरीही तुलसीदास यांनी या आक्रमणाचे स्वरूप समजावून सांगितले. प्रबोधन केल्याने अनेक राजांनी सामना केला. सामान्य लोकांमध्येही त्यानी जनजागृती केली. हिंदू धर्म हा एक आहे, त्यास पंथात विभागू नका हे त्यांनी सांगितले. तुलसीदासांनी रामलीला नाट्य-प्रकारची सुरुवात केली.

ग्रंथ रचना

काशी आणि अयोध्या येथे (संवत १६३१) श्रीरामचरितमानस आणि विनय पत्रिका या रचना केल्या. आजचा सुप्रसिद्ध पाठ हनुमान चालीसा ही तुलसीदास यांची रचना आहे. श्रीरामचरितमानस लिखाणासाठी त्यांना प्रत्यक्ष भगवान श्रीराम यांनी आज्ञा केली होती असे मानतात. त्यांनी संस्कृतमधील वाल्मीकी रामायणाचे अवधी भाषेत रूपांतर करून त्याचे नाव 'रामचरितमानस' असे ठेवले. हे लेखन त्यांनी निव्वळ सव्वीस दिवसात पूर्ण केले होते.

  • दोहावली,
  • कवित्तरामायण,
  • गीतावली,
  • रामचरित मानस,
  • रामलला नहछू,
  • पार्वतीमंगल,
  • जानकी मंगल,
  • बरवै रामायण,
  • रामाज्ञा,
  • विन पत्रिका,
  • वैराग्य संदीपनी,
  • कृष्ण गीतावली
  • रामसतसई,
  • संकट मोचन,
  • हनुमान बाहुक,
  • रामनाम मणि,
  • कोष मञ्जूषा,
  • रामशलाका,
  • हनुमान चालीसा.

रचना नमुना

"रामायण अनुहरत सिख, जग भई भारत रीति। तुलसी काठहि को सुनै, कलि कुचालि पर प्रीति।"