तुर्रा बेसरा
तुर्रा बेसरा किंवा शेंडूर्ली बेसरा (इंग्लिश: North indian crested goshawk; हिंदी: तुर्राबाज; गुजराती: चोटलियो) हा वाजी कुळातील एक पक्षी आहे.
ओळख
हा पक्षी आकाराने कावळ्यापेक्षा मोठा असतो. वाजी कुळातील तुरा असलेला एकुलता एक पक्षी आहे. उडताना हा तुरा दिसत नाही. झाडावर बसल्यावर स्पष्ट दिसतो. या पक्ष्याला भुवई नसते. आकाराच्या मानाने पंख लहान असत. पंख मिटले कि,त्यांची टोके शेपटीच्या मुळांपर्यंत येतात.पोटाखालील भाग पांढरा असतो.नर मादीत फरक असतो.मादी नरापेक्षा मोठी असते.
हा पक्षी पूर्व गढवाल ते सिक्कीम, ईशान्य भारतात व दक्षिण भारतातील गोदावरीच्या खोऱ्यात आढळतो. हे पक्षी पानगळी व निमचिरपल्लवी जंगले तसेच हिमालयात २,००० मीटर उंचीपर्यंतचा प्रदेशात असतात.
या पक्ष्याची मार्च ते मे या काळात भारतात वीण होते.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली