Jump to content

तुर्कस्तानचे प्रदेश

तुर्कस्तानचे प्रदेश: 1. मार्मारा प्रदेश, 2. मध्य अनातोलिया प्रदेश, 3. एजियन प्रदेश, 4. भूमध्य प्रदेश, 5. काळा समुद्र प्रदेश, 6. आग्नेय अनातोलिया प्रदेश, 7. पूर्व अनातोलिया प्रदेश

तुर्कस्तान देश ७ भौगोलिक प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. हे सात प्रदेश एकूण २१ उप-प्रदेशांमध्ये वाटले गेले आहेत. ह्या प्रदेशांची रचना १९४१ साली करण्यात आली. ह्या प्रदेशांचा वापर प्रशासकीय कारणांसाठी होत नसून केवळ भौगोलिक, लोकसांख्यिक व आर्थिक माहितीसाठी ते वापरले जातात.