Jump to content

तुती

🌿तुती लागवड पद्धत:-

      तुती लागवडीसाठी प्रथमतः तुटीच्या कांड्या (लाकड 🥢 ) घेतली जाते.     

तेेे ५ते६ इंच उंचीचे व ३ डोळे असणाऱ्या कांड्या जमिनीत उभ्या पुरल्या जातात.     व येक डोळा वरती ठेवला जातो.             

  या पद्धती रोप तयार केले जाते.

तुती
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: फुलझाड
जात: [[]]
वर्ग: [[]]
कुळ: [[]]
जातकुळी: '''''
[[]]

तुती ही एक वनस्पती आहे. रेशीम उद्योगाची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते. यामध्ये व्ही-१ व एस-१६३५ या तुतीच्या जातीच्या लागवडीतून पाल्याचे उत्पादन चांगले मिळते असे मानले जाते. या जाती बागायती क्षेत्राकरिता प्रसारित करण्यात आल्या आहेत. तुतीची लागवड पावसाळ्यामध्ये करता येते. जमिनीची मशागत करून एक एका पट्ट्यात ५ फुट - २ फुट अंतरावर तुती लागवड केली जाते. तुतीचे पहिले पीक तयार होण्यास ५ ते ६ महिने लागतात. पहिल्या पिकाचा पाला रेशीम किडय़ांना खाऊ घातल्यानंतर तुतीच्या झाडांची जमिनीपासून एक फूट उंचीवर छाटणी केली जाते. यानंतर येणारे पीक साधारणपणे दोन महिन्यांत तयार होते. अशाप्रकारे दुसऱ्या वर्षांपासून प्रतिवर्षी पाच ते सहा पिके बागायती जमिनीतून मिळतात. एकदा लागवड केलेल्या तुतीच्या झाडापासून २० ते २५ वर्षांपर्यंत पाला उपलब्ध होऊ शकतो. तुतीचे नाव मोरस अल्बा[morous alba] कुळ- मोरेसी [Moraceae]असे आहे


महाराष्ट्रात पुणे जिल्ह्य़ाचे हवामान तुतीच्या लागवडीसाठी व एकूणच रेशीम उत्पादन व्यवसायासाठी अनुकूल आहे.

बाह्य दुवे