Jump to content

तुतवार

तुतवार, तुतारी (Common sandpiper)

तुतवार, टीलवा,लहान टिलवा, टिंबूल, टीवला किंवा टिंबा (इंग्लिश:common sandpiper) हा एक पक्षी आहे.

आकाराने अंदाजे लाव्याएवडा. वरून राखट तपकिरी. खालून पांढरा व छातीवर धूसर पिंकट. मानेच्या पुढच्या बाजूला विरळ गडद काड्या. उडताना पंखावर पांढरी पट्टी. शेपटीच्या दोन्ही काठाची पिसे पांढरी दिसतात. नरमादी दिसायला सारखे असतात.

चित्रदालन

वितरण

भारत, श्रीलंका, नारकोदाम आणि निकोबार बेटांत हिवाळी पाहुणे

निवासस्थाने

तळी, समुद्रकिनारे आणि मुख्यतः चिखलाणी प्रदेशात आढळून येतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली