Jump to content

तुडपुडी

तिडपुडी याला 'तेंडु 'चे झाडही म्हणतात.. मोठया झाडाला 'टेंभरुचे झाड' व लहान झाडाला 'तिडपुडी' म्हणतात. वृक्ष मोठा होतो. मोठया लाकडाचा घरासाठी पाट्या, झोपडीसाठी 'बुंदे' (मुंड्या- खांब), शेतीचे अवजार, 'बोडी' (विहिरीवरचा काडीकाटा), औत इत्यादी अनेक गोष्टी बनवायला उपयोग करतात. याच्या लाकडाची 'बुढढया' (म्हाताऱ्या) लोकांसाठी काडी बनवतात. लहान फांद्या जळण्यासाठी वापरतात. काड्या चटाचटा जळतात, पण तीळ भाज्ल्यासारखा किंवा फटाक्यासारखा 'तिड-तिड' आवाज येतो व तिडक्या उधळतात , म्हणून तिडपुडी हे नाव ! जळताना धोका पण होऊ शकतो ; लुग्ड्याला छिद्रे पडतात किंवा अंग भाजते. टेंभराच्या झाडावर 'महाडोर सरप' (घोणस) असा समज आहे. अजगरदेखील राहतो. त्याला 'चित्या सरप' ही म्हणतात. हा साप माणसाला 'गिटकतो' (गिळतो) व त्याला 'आट' (पीळ) मारतो . त्यामुळे माणसाची सारी हाडे मोडून तो मरून जातो. 'महारोगा'ची (कुष्ठरोगाची) बिमारी असलेले लोक या महाडेर सर्पाची भाजी करून खातात. त्यामुळे बिमारी कमी होते असे मानतात.हगवण लागली , अजीर्ण झाले, पोट 'फुंगारा धरला' (फुगले), तर टेंभराची साल कुटून त्याचा रस पाण्यात प्यायला देतात.टेंभराचा डिंक क्वचितच कुणाला तरी 'भेटतो' , 'सवाशीण' व तरुण बाईने हा डिंक खाऊ नये. कारण तो खाल्याने पाळी येत नाही व मुल बाळ होत नाही. बाईने डिंक खाल्ला तरी ती 'माणसात मजरा होते' (पुरुष होते) बाई राहत नाही