Jump to content

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!
निर्माता संजय झनकर
निर्मिती संस्था झनकर फिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ३०६
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३० ऑगस्ट २०२१ – ६ ऑगस्ट २०२२
अधिक माहिती
आधी माझी तुझी रेशीमगाठ
नंतर चला हवा येऊ द्या / डान्स महाराष्ट्र डान्स / बस बाई बस

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कथानक

अदिती ही एक श्रीमंत घरातील मुलगी असते. तिच्या आई-वडिलांमध्ये विकोपाचे वाद असल्याने ते घटस्फोट घेण्याच्या स्थितीत असतात. त्यामुळे अदितीला लहानपणापासूनच एकत्र कुटुंबाची सवय नसल्याने त्याची मनात खूप भीती असते. सिद्धार्थ हा मोठ्या एकत्र कुटुंबात वाढलेला गुळपोळी गावातील एक मुलगा असतो. सिद्धार्थ मुंबईला उच्च शिक्षण आणि नोकरीनिमित्त येतो, तेव्हा त्याची अदितीशी भेट होते. हळूहळू दोघांमध्ये प्रेम वाढीस लागते व त्यानंतर तो अदितीला गावी त्याच्या कुटुंबाशी भेटायला घेऊन जातो. जेव्हा अदिती सिद्धार्थच्या कुटुंबाला पाहते, तेव्हा ती भांबावते आणि त्याचं घर सोडून हॉटेलवर राहायला निघून जाते. परंतु सिद्धार्थच्या घरचे अदितीची समजूत आणि भीती घालवून तिला परत घरी आणतात.

कलाकार

  • हार्दिक जोशी - सिद्धार्थ अप्पा देशमुख
  • अमृता पवार - अदिती मिलिंद करमरकर / अदिती सिद्धार्थ देशमुख
  • प्रिया कांबळे-तुळजापूरकर - महालक्ष्मी मिलिंद करमरकर
  • धनंजय वाबळे - मिलिंद करमरकर
  • रुपाली कदम - अलविरा
  • सौरभ काळे - राघव
  • चारुदत्त कुलकर्णी - तात्या देशमुख
  • सुरेखा लहामगे-शर्मा - बयो तात्या देशमुख
  • अंजली जोशी / मंजुषा जोशी - सुमित्रा अप्पा देशमुख (मोठ्याबाई)
  • प्रशांत गरुड / राजा राणा - अप्पा तात्या देशमुख
  • अपर्णा क्षेमकल्याणी - रत्ना जाधव
  • योगेश बागुल - जावई
  • चित्रा कुलकर्णी / शुभदा नाईक - ताई काकी
  • हेमंत देशपांडे - बापू तात्या देशमुख
  • पूनम चव्हाण-देशमुख - नानी काकी
  • निवास मोरे / संजय गंगावणे - नाना तात्या देशमुख
  • रेखा कांबळे-सागवेकर / ज्योती राऊळ - पल्लवी बाळा देशमुख (पल्लू)
  • सलमान तांबोळी - बाळा तात्या देशमुख (डॉक्टर)
  • कोमल शेटे - अर्चना सुहास देशमुख
  • प्रतीक पाटील - सुहास बापू देशमुख (प्रोफेसर)
  • मीरा देशमुख - मीरा सुहास देशमुख
  • सुहानी नाईक - आर्या नाना देशमुख
  • अर्जुन कुमठेकर - धृष्टद्युम्न नाना देशमुख (दुमन्या)
  • राधिका झनकर - नमिता बापू देशमुख (नमा)
  • शुभम पाटील - युवराज
  • लक्ष्मी पिंपळे - सुरेखा
  • निखिल रहाणे - अमित
  • अक्षय धोंड - सचिन
  • अजय तारगे - सखा
  • गणेश जाधव - चंद्रकांत भिंगार्डे (चॅंडलर)
  • वीणा जगताप - रेवा दीक्षित
  • स्नेहल शिदम
  • रोहित चव्हाण

विशेष भाग

  1. कुटुंब कितीही मोठं असलं तरी चूल एक असेल तर घर बांधलेलं राहतं! (३० ऑगस्ट २०२१)
  2. गर्लफ्रेंडसमोर कधीही थापा मारु नये! अदितीबद्दल घरातल्यांसमोर थाप मारणे येणार सिद्धार्थच्या अंगाशी. (३१ ऑगस्ट २०२१)
  3. डॉक्युमेंट्री पाहताना घरच्यांसमोर येणार का अदिती-सिद्धूच्या लव्हस्टोरीचा ब्लॉकबस्टर सिनेमा? (१ सप्टेंबर २०२१)
  4. बापू काकाच्या गैरसमजामुळे सिद्धू देणार भलत्याच मुलीला लग्नासाठी होकार. (२ सप्टेंबर २०२१)
  5. घरच्यांसमोर सिद्धू करु शकेल का अदितीसोबतच्या नात्याचा खुलासा? (३ सप्टेंबर २०२१)
  6. अदिती आणि सिद्धूच्या कुटुंबाची होणार पहिल्यांदाच भेट. (२८ सप्टेंबर २०२१)
  7. मॉम-डॅडबद्दल घरच्यांचा झालेला गैरसमज कसे दूर करतील अदिती-सिद्धू? (३० सप्टेंबर २०२१)
  8. एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, बाप्पाच्या स्वागताला होणार सूनबाई तयार. (२ ऑक्टोबर २०२१)
  9. सिद्धूमुळे अदिती पहिल्यांदा अनुभवणार सणाचा आनंद. (५ ऑक्टोबर २०२१)
  10. बाप्पाच्या साक्षीने सिद्धार्थ देणार अदितीची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचं वचन. (७ ऑक्टोबर २०२१)
  11. सिद्धार्थच्या लग्नाच्या वयात अप्पा-मोठ्या बाईंकडे गुड न्यूझ? सिद्धू-अदितीच्या लव्हस्टोरीत नवा गोंधळ. (१३ ऑक्टोबर २०२१)
  12. अप्पा-मोठ्या बाईंच्या मुंबईच्या धडक मोहिमेने फसले अदिती आणि सिद्धू. (२१ ऑक्टोबर २०२१)
  13. महालक्ष्मी-मिलिंदच्या घटस्फोटाची बातमी कळली तर, अप्पा-मोठ्या बाई आल्याने सिद्धू-अदितीची उडणार तारांबळ. (२३ ऑक्टोबर २०२१)
  14. अदिती घर सोडून जाण्याचा निर्णय घेणार. (२७ ऑक्टोबर २०२१)
  15. मॉम-डॅडच्या घटस्फोटाची बातमी लपवण्यासाठी अदिती-सिद्धूची धडपड. (३१ ऑक्टोबर २०२१)
  16. कशी झाली सिद्धू-अदितीच्या लव्हस्टोरीची सुरुवात? (२ नोव्हेंबर २०२१)
  17. अदितीच्या मॉम-डॅडला एकत्र आणण्यासाठी सज्ज झालं देशमुख कुटुंब. (४ नोव्हेंबर २०२१)
  18. गुळपोळी गावात बिबट्याची घुसखोरी. (१० नोव्हेंबर २०२१)
  19. देशमुखांची मिशन म.मी.ला सुरुवात. (२१ नोव्हेंबर २०२१)
  20. देशमुख मंडळींचा खोटेपणा तात्यांसमोर उघड. (२३ नोव्हेंबर २०२१)
  21. देशमुखांचं हसतं-खेळतं कुटुंब मोडण्यात यशस्वी होईल का महालक्ष्मी? (२७ नोव्हेंबर २०२१)
  22. महालक्ष्मीचा डाव बेतेल का अदितीच्या जीवावर? (२३ डिसेंबर २०२१)
  23. देशमुखांच्या सुनांचा घर सोडण्याचा निर्णय आला त्यांच्याच अंगाशी. (२६ डिसेंबर २०२१)
  24. अदितीची पहिल्यांदा खऱ्या अर्थाने होणार दिवाळी साजरी. (२८ डिसेंबर २०२१)
  25. फसणार डाव महालक्ष्मीचा, मुहूर्त ठरणार सिद्धार्थ-अदितीच्या साखरपुड्याचा. (९ जानेवारी २०२२)
  26. देशमुखांची मुंबईवारी येऊन पोहोचेल महालक्ष्मीच्या दारी. (१९ जानेवारी २०२२)
  27. देशमुख मंडळींच्या स्वागताला पोहोचू शकेल का अदिती? (२२ जानेवारी २०२२)
  28. सिद्धार्थच्या कुटुंबाला अदिती सावरणार, पार्टीसाठी देशमुखांना तयार करणार. (२५ जानेवारी २०२२)
  29. दोघात आला तिसरा, अदिती आणि सिद्धार्थचा पार पडेल का साखरपुडा? (२७ जानेवारी २०२२)
  30. युवराजला कंठ फुटला, महालक्ष्मीचा प्लॅन फसला? (२९ जानेवारी २०२२)
  31. सिद्धार्थ-अदितीमध्ये फूट पाडायला महालक्ष्मी आता वापर करणार युवराजच्या आवाजाचा. (१ फेब्रुवारी २०२२)
  32. युवराजच्या आव्हानात अदितीच्या प्रेमासाठी जिंकेल का सिद्धार्थ? (६ फेब्रुवारी २०२२)
  33. सिद्धार्थच्या प्लॅननुसार युवराज देशमुखांमध्ये रमला आणि महालक्ष्मीचा डाव फसला. (१० फेब्रुवारी २०२२)
  34. सिद्धार्थच्या चांगुलपणाने बदलणार युवराजचा निर्णय. (१३ फेब्रुवारी २०२२)
  35. मोठ्या कुटुंबाचं अस्सल गावाकडचं मराठी लग्न! (१६ फेब्रुवारी २०२२)
  36. सिद्धार्थची पैज अदितीच्या जीवावर बेतणार, सासऱ्यांचा राग अनावर होणार. (२० फेब्रुवारी २०२२)
  37. सुहास-अर्चनामधील भांडण मिटवू शकेल का अदिती? (२ मार्च २०२२)
  38. अदितीला हवंय कुटुंब, सिद्धू रंगवतोय अमेरिकेची स्वप्नं. (६ मार्च २०२२)
  39. सिद्धार्थचा खोटेपणा अदितीसमोर उघड होणार का? (१२ मार्च २०२२)
  40. अदितीच्या वागण्यातील खोटेपणा घडवणार देशमुखांच्या घरात स्फोट. (२३ मार्च २०२२)
  41. अदितीने सिद्धार्थचं सत्य सांगणं मोठ्या बाईंच्या जीवावर बेतणार का? (२६ मार्च २०२२)
  42. सिद्धार्थ कायमचा घर सोडून निघून गेलाय हे घरातल्यांना सांगू शकेल का अदिती? (२८ मार्च २०२२)
  43. अमेरिकेच्या नादापायी सिद्धार्थ खोटं बोलून अदितीचे दागिनेही विकणार. (१ एप्रिल २०२२)
  44. एकत्र कुटुंबावर सिद्धार्थने पहिला घाव घातला, हिस्स्याची मागणी करत त्याने डाव साधला. (६ एप्रिल २०२२)
  45. सिद्धार्थ मिलिंदच्या साथीने पुन्हा फसवू शकेल का देशमुखांना? (९ एप्रिल २०२२)
  46. नव्या संकल्पांनी साजरा होणार सिद्धार्थ-अदितीचा पहिला पाडवा. (१३ एप्रिल २०२२)
  47. सिद्धार्थची नवी युक्ती, रेवाच्या मार्फत मिळेल गूळपोळीतून मुक्ती. (१७ एप्रिल २०२२)
  48. देशमुख बॉईज लागले रेवाच्या पाहुणचारात, बायका मात्र संशयात. (२१ एप्रिल २०२२)
  49. अदितीच्या मनात शंका, रेवा-सिद्धूमधील जवळीक फक्त मैत्री की अजून काही? (२३ एप्रिल २०२२)
  50. एक सक्षम व्यवसायिका म्हणून कशी सिद्ध करेल अदिती स्वतःला? (२५ एप्रिल २०२२)
  51. सिद्धूने केलेल्या अपमानाचा काय होणार देशमुखांवर परिणाम? (२७ एप्रिल २०२२)
  52. सिद्धूचा निशाणा अचूक लागणार, पल्लूच्या मनात वादाची ठिणगी पेटणार. (३० एप्रिल २०२२)
  53. देशमुखांची चूल एकसंध ठेवायला बयोबाईने वाटल्या तिजोरीच्या चाव्या. (४ मे २०२२)
  54. नानाचं डोकं फिरलं, तिजोरीच्या चावीनं त्याच्या मनात घर केलं. (६ मे २०२२)
  55. येणाऱ्या पाहुण्यामुळे तरी होतील का देशमुख परत एकत्र? (८ मे २०२२)
  56. हसत्या-खेळत्या घरात वादाचा कहर पाहून बयोला आली भोवळ. (१० मे २०२२)

बाह्य दुवे

रात्री ९च्या मालिका
आभाळमाया | वादळवाट | वहिनीसाहेब | अभिलाषा | कळत नकळत | लक्ष्मणरेषा | शुभं करोति | अमरप्रेम | पिंजरा | अजूनही चांदरात आहे | तुझं माझं जमेना | एका लग्नाची तिसरी गोष्ट | का रे दुरावा | काहे दिया परदेस | स्वराज्यरक्षक संभाजी | माझ्या नवऱ्याची बायको | एक गाव भुताचा | माझा होशील ना | तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! | नवा गडी नवं राज्य | शिवा