तीस्ता नदी
तीस्ता नदी তিস্তা | |
---|---|
तीस्ताचे सिक्कीममधील पात्र | |
उगम | झेमू ग्लेशियर, हिमालय |
मुख | ब्रह्मपुत्रा नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश | भारत, बांगलादेश |
लांबी | ३०९ किमी (१९२ मैल) |
उगम स्थान उंची | ७,०६८ मी (२३,१८९ फूट) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | १२,५४० |
ह्या नदीस मिळते | ब्रह्मपुत्रा नदी |
तीस्ता (बांग्ला: তিস্তা) ही भारताच्या सिक्कीम राज्यामधील प्रमुख नदी आहे. सिक्कीमच्या उत्तर भागात भारत-चीन देशांच्या सीमेजवळ हिमालय पर्वतामध्ये उगम पावणारी तीस्ता दक्षिण व आग्नेय दिशांना ३०९ किमी वाहत जाऊन बांगलादेशाच्या रंगपूर जिल्ह्यात ब्रह्मपुत्रेला मिळते. सिक्कीम व पश्चिम बंगाल राज्यांची सीमा तीस्तावरून ठरवण्यात आली आहे. जलपाईगुडी व कालिंपोंग ही उत्तर बंगालमधील प्रमुख शहरे ह्याच नदीच्या काठावर वसली आहेत.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत