Jump to content

तीळगूळ

तिळगूळ आणि हलवा

तिळगूळ हा तीळ आणि गूळ यांपासून बनवलेला एक खाद्यपदार्थ आहे. हा खाद्यपदार्थ लाडवाच्या किंवा वडीच्या रूपात तयार केला जातो. मकर संक्रांतीला तिळगूळ वाटण्याची विशेष पद्धत आहे.[]

सामाजिक महत्त्व

तिळगूळ एकमेकांना देताना "तिळगूळ घ्या गोड बोला"असे म्हणले जाते. एकमेकातील द्वेष, राग ,वैर आणि कटुता विसरून एकमेकांशी स्नेहसंबंध वाढते रहावेत यायचे प्रतीक म्हणून तिळगूळ दिला जातो.[]

आरोग्यदृष्ट्या महत्त्व

मकरसंक्रांत सणाच्या काळात उत्तरायणात हवेमध्ये गारठा असतो, हिवाळा ऋतू सुरू असतो. त्यामुळे तीळ [] आणि गूळ यांचे मिश्रण हे शरीराला उष्णता मिळवून देते.[]

पाककृती

तीळवडी

तिळगूळ तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत.

  • तीळ खमंग भाजून घेतले जातात. गुळाचा पाक करून त्यामध्ये तीळ घालून त्याचे लाडू वळले जातात किंवा कडक वड्या केल्या जातात.


  • तिळाचे कूट आणि शेंगदाण्याचे कूट गुळाच्या पाकात एकत्र करून त्याचे लाडू किंवा वड्या केल्या जातात. यामध्ये गूळ पातळ करताना त्यात थोडे तूप घातले जाते.[]


  • गुळाची पोळी- तीळ आणि गूळ यांचे मिश्रण करून त्यात भाजून हरभरा डाळीचे पीठ, सुके खोबरे घालतात.कणीक आणि मैदा यांच्या मिश्रणाचा गोळा करून त्यात गुळाचे सारण भरून त्याची पोळी लाटतात. याला गुळाची पोळी असे महाराष्ट्रात म्हणले जाते.[]
  • याशिवाय, वरील पदार्थ गुळाऐवजी साखर वापरून करण्याचापण प्रघात आहे.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

  1. ^ Marāṭhī viśvakośa. Mahārāshṭra Rājya Sāhitya Sāskr̥ti Maṇḍaḷa. 1973.
  2. ^ Patke, P. S. (1972). Vyakti titakyā prakr̥ti. Prapañca Prakāśana.
  3. ^ LIMAYE, Dr ARVIND (2007-09-01). ANNAPURAN - AAYURVEDIC AADHUNIK. Mehta Publishing House. ISBN 9789387319738.
  4. ^ "https://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle-news/health-news/til/articleshow/29260831.cms". २४. १. २०१४ (सुधारित). 2017-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); External link in |title= (सहाय्य)
  5. ^ साळवे, सचिन (१२. १. २०१८). "मकर संक्रांतीला असे बनवा 'तिळगुळाचे लाडू'". |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ Delights from Maharashtra (इंग्रजी भाषेत). Jaico Publishing House. 1975-01-01. ISBN 9788172245184.