Jump to content

तीरे संस्कृताची गहने

तीरे संस्कृताची गहने हा डॉ. केशव रामराव जोशी यांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. ग्रंथाचे नाव ज्ञानेश्वरीतील पुढील ओवीवरून घेतले आहे.


तीरे संस्कृताची गहने ।
तोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपाने ।
रचिली धर्मनिधानें ।
श्रीनिवृत्तिदेवे ॥,,,, ज्ञानेश्वरी ११/९.

ह्य ओळींचा अर्थ असा आहे की धर्माचा ठेवा असलेले माझे गुरू निवृत्तीनाथ यांनी (मला निमित्त करून), संस्कृत भाषारूपी कठीण (उंच डगरींचे) किनारे फोडून, मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला.