तिसरा फ्रीडरिश (जर्मन सम्राट)
फ्रीडरिश तिसरा | |
कार्यकाळ ९ मार्च १८८८ – १५ जून १८८८ | |
मागील | विल्हेल्म पहिला |
---|---|
पुढील | फ्रीडरिश तिसरा |
जन्म | १८ ऑक्टोबर १८३१ पोट्सडाम, प्रशिया |
मृत्यू | १५ जून, १८८८ (वय ५६) पोट्सडाम, जर्मन साम्राज्य |
वडील | विल्हेल्म पहिला |
फ्रीडरिश तिसरा (जर्मन: Friedrich Wilhelm Nikolaus Karl; १८ ऑक्टोबर १८३१ - १५ जून १८८८) हा १८८८ साली अल्प काळाकरिता प्रशियाचा राजा व जर्मन साम्राज्याचा दुसरा सम्राट (Deutscher Kaiser) होता. फ्रीडरिश तिसरा पहिल्या विल्हेल्मचा एकमेव मुलगा होता व ९ मार्च १८८८ रोजी विल्हेल्मच्या मृत्यूनंतर तो राज्यपदावर आला. परंतु केवळ ९९ दिवस ह्या पदांवर राहिल्यानंतर १५ जून १८८८ रोजी तो कर्करोगामुळे मरण पावला.
तिसरा फ्रीडरिश त्याच्या उदारमतवादी विचारांसाठी प्रसिद्ध होता.