तिसरा चामराज वोडेयार
तिसरा चामराज वोडेयार | ||
---|---|---|
मैसुरुचा पाचवा राजा | ||
अधिकारकाळ | १५१४-१५५३ | |
अधिकारारोहण | १५१४ | |
राज्याभिषेक | १५१४ | |
राजधानी | मैसुरु | |
पदव्या | महा मंडलेश्वरा बिरुद-अंतेंबरा-गंदा हिरिय बेट्टाडा विजय चामराज वोडेयार | |
जन्म | २९ सप्टेंबर, १४९२ | |
मृत्यू | १७ फेब्रुवारी, १५५३ | |
मैसुरु | ||
पूर्वाधिकारी | दुसरा चामराज वोडेयार | |
' | दुसरा तिम्मराज वोडेयार | |
उत्तराधिकारी | दुसरा तिम्मराज वोडेयार | |
वडील | दुसरा चामराज वोडेयार | |
संतती | दुसरा तिम्मराज वोडेयार, कृष्णराज, चिक्क देविरा, चौथा चामराज वोडेयार | |
राजघराणे | वडियार घराणे | |
धर्म | हिंदू |
तिसरा चामराज वोडेयार (२९ सप्टेंबर, १४९२ - १७ फेब्रुवारी, १५५३:मैसुरु) हा मैसुरु राज्याचा पाचवा राजा होता. हा विजयनगर साम्राज्यात सामंत राजा म्हणून राज्य करणारा मैसुरुचा शेवटचा राजा होता. याने १५१३-१५५३ दरम्यान राज्य केले
विजयनगरचे सामंत
तिसऱ्या चामराजाने तुलुवा वंशातील चार विजयनगर सम्राटांच्या आधीन राहून राज्य केले. त्याच्या राज्याभिषेकाच्या वेळी सम्राट कृष्णदेवरायाच्या विजयनगरच्या सिंहासनावर होता. त्याच्यानंतर त्याच भाऊ अच्युत देव राय सिंहासनावर आला. यानंतर अच्युत देवरायाचा मुलगा वेंकट राय विजयनगरचा सम्राट झाला. यावेळी त्याच्या मामा शलाकराजू चिन्न तिरुमला ने कट करून वेंकट राय व इतर सर्व राजकुमारांची हत्या केली व स्वतः सम्राट झाला. तो फार काळ टिकला नाही. वेंकट रायाच्या अनुयायांनी शलाकराजूची हत्या केली आणि अच्युत रायचा पुतण्या सदाशिव रायाला सिंहासनावर बसवले. कृष्णदेवरायाचा जावई अलिया राम राय त्याचा अमात्य होता वर तोच साम्राज्याचा कारभार बघत असे. या उलथापालथी दरम्यान तिसऱ्या चामराजाने विजयनगरचे प्रभुत्व नाकारणे सुरू केले. प्रत्यक्षात या बाबतीत काही करण्याआधीच चामराज मृत्यू पावला.
मैसुरु महाल
तिसऱ्या चामराजाने आत्ताच्या मैसुरु शहराच्या स्थानी असलेल्या पुरागिरी नावाच्या गावाला तटबंदी केली आण त्यात आपला भव्य महाल उभारला. याला मैसुरु नगर असे नाव देउन अधिकृतपणे या शहराला आपली राजधानी घोषित केली. [१] यानंतर या तटबंदीची अनेक वेळा डागडुजी करून जीर्णोद्धार केला गेला.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Director of Census Operations, Karnataka (1992). Census of India, 1991: Tables on houses and household amenities. Government Suburban Press. p. 13.