तिरुमलई नायक्कर महाल
तिरुमलै नायक्कर महाल तथा नायक महाल हा भारताच्या मदुराई शहरातील राजवाडा आहे. हा राजवाडा १६३६मध्ये मदुरैच्या नायक वंशाच्या तिरुमलै नायक याने बांधून घेतला. हा महाल राजपूत-द्रविड शैलीचा असून मीनाक्षी मंदिरापासून २ किमी अंतरावर आहे.
२०१९ च्या सुमारास शाबूत असलेली वास्तू राजाचा मुख्य महाल होता तर मूळ राजवाडा याच्या चौपट विस्ताराचा होता. अठराव्या शतकात याची मोडतोड करण्यात आली होती.