तिरुपती
तिरुपती हे स्थान आंध्र प्रदेश राज्यात आहे. बालाजी मंदिरासाठी विख्यात आहे.
तिरुपती बालाजी मंदिर, तिरुमला येथे भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांमध्ये मोडते. तिरु म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती(विष्णू). येथे बालाजीचे विख्यात मंदिर आहे. शहरापासून जवळच असलेल्या डोंगरावर बालाजीचे मंदिर आहे. या डोंगरास तिरुमला असे म्हणतात. तेलुगू व तमिळ भाषेत मला/मलई म्हणजे डोंगर/पर्वत होय.बालाजी हा विष्णूचा अवतार मानला जातो. हे ठिकाण रेल्वे व महामार्गाने चेन्नई व बंगळूर या शहरांशी उत्तम प्रकारे जोडलेले आहे. तिरुपती मंदिर हे देशातील एक श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखले जाते देशातून व जगभरातून पर्यटक या मंदिराला भेट देतात पर्यटनाच्यादृष्टीने या ठिकाणाचा मोठा विकास करण्यात आलेला आहे.
तिरुपती शहर हे आंध्र प्रदेश राज्याच्या दक्षिण टोकावर चित्तूर जिल्ह्यात आहे. हे ठिकाण राजधानी हैदराबादपासून ७४० किंमी अंतरावर आहे. येथून ३६ किमी अंतरावर श्री कालाहस्ती नावाचे दक्षिणेतील प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे.
चित्र दालन
- प्रवेश
- रात्रीचे दृश्य
- तिरुपती येथील 'स्वामी पुष्करणी'
- तिरुपती येथील 'स्वामी पुष्करणी' - रात्रीचे दृश्य
- तिरुपती येथील हत्ती
- तिरुपती येथील रथ
- दगडांची नैसर्गिक कमान
- टेकडीवरचे राष्ट्रीय उद्यान-१
- टेकडीवरचे राष्ट्रीय उद्यान-२
बाह्य दुवे
- तिरुपती विषयी आधिक माहिती
- तिरुपती येथे जगातील सर्वात्त मोठी सौरचूल आहे
- तिरुमला तिरुपती देवस्थान - आधिकृत संकेतस्थळ Archived 2016-02-02 at the Wayback Machine.
- श्री वेंकटेश्व्रर विद्यापीठ Archived 2016-02-02 at the Wayback Machine.
- बालाजी चित्रे Archived 2009-01-23 at the Wayback Machine.
- वैद्यकीय महाविद्यालय, तिरुपती