तिएरा देल फ्वेगो प्रांत (आर्जेन्टिना)
तिएरा देल फ्वेगो Provincia de Tierra del Fuego, Antártida e Islas del Atlántico | |||
आर्जेन्टिनाचा प्रांत | |||
| |||
तिएरा देल फ्वेगोचे आर्जेन्टिना देशामधील स्थान | |||
देश | आर्जेन्टिना | ||
राजधानी | उश्वैया | ||
क्षेत्रफळ | २१,२६३ चौ. किमी (८,२१० चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १,०१,०७९ | ||
घनता | ४.७५ /चौ. किमी (१२.३ /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | AR-V | ||
संकेतस्थळ | http://www.tierradelfuego.gov.ar/ |
तिएरा देल फ्वेगो प्रांत (स्पॅनिश: Provincia de Tierra del Fuego, Antártida e Islas del Atlántico) हा आर्जेन्टिनाचा सर्वांत दक्षिणेकडील प्रांत आहे. हा प्रांत संलग्न आर्जेन्टिनापासून मेजेलनच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे. ह्या प्रांतामध्ये खालील भूभागांचा समावेश होतो:
- तिएरा देल फ्वेगो ह्या बेटाचा पूर्वेकडील भाग
- फॉकलंड द्वीपसमूह व साउथ जॉर्जिया व साउथ सॅंडविच द्वीपसमूह: ही बेटे युनायटेड किंग्डमच्या अधिपत्याखाली आहेत पण आर्जेन्टिनाने त्यांवर हक्क सांगितला आहे.
- अंटार्क्टिका खंडावरील आर्जेन्टिनाने हक्क सांगितलेला भाग
संदर्भ
बाह्य दुवे
- सरकारी संकेतस्थळ Archived 2011-01-14 at the Wayback Machine. (स्पॅनिश)
- पर्यटन (इंग्रजी) (स्पॅनिश)