Jump to content

ताल

उत्तर हिंदुस्तानी संगितात सुराला कालखंडाशी बांधण्याचे काम ताल करतो. उदा. त्रितालात १६ मात्रा आहेत. म्हणजे १६ समय अंश (वा तालाचे एकक (unit) ) एकत्र करून तालाची निश्चिती होते. याप्रमाणे वेगवेगळ्या मात्रा असलेले इतर ताल आहेत. जसे १० मात्र्यांचा झपताल किंवा ७ मात्र्यांचा रुपक. तालाने सांगितिक वेळ निश्चित केली जाते. अर्थातच प्रत्येक तालाची स्वतःची प्रकृती असते. तालाची तीच ती आवर्तने कंटाळवाणी असल्याने मूळ कालखंड कायम ठेवून तबलजी तालाचा विस्तार करतो. यासाठी कायदे, पेशकार, चक्रधार अशी अनेक ताल-उपांगे वापरतात. यातून ठेक्याचे(rhythm) विविध आकृतीबंध (pattern) तबलजी बनवितो. आधारभूत सांगितिक कालखंड जरी तोच असला तरी तबलजीस लयीचे स्वातंत्र्य असते म्हणूनच बढत घेत तबलजी दृत लयीत जाऊ शकतो. उदा: १६ मात्र्यांच्या त्रितालामुळे जो आधारभूत सांगितिक कालखंड तयार होतो तितक्याच कालखंडात ३२ मात्र्यांचा कायदा वाजवून समेवर येता येते. संगितास ठेका देण्यासाठीही तालाचा वापर होतो.

तालाची पारंपारिक परिभाषा

व्याख्या

विशिष्ट कालावधीत दोन्ही हातांच्या संयोगाने वा वियोगाने काल, मार्ग, क्रिया, अंग, ग्रह, जाती, कला, लय, यती व प्रस्तार अशा दहा प्राणांनी व्याप्तमान ठेका होय.[१]

तालाचे दशप्राण

  • काल: त्रुटी, अनुद्रुत, द्रुत, लघु, गुरू, काकपद, हंसपद आणि महाहंसपद असे दहा काल आहेत. काल वेळेची मोजणी करण्यासाठी वापरतात. महाहंसपद काल त्रुटीच्या १२८ पट असतो.
  • मार्ग: दक्षिण, वार्तिक, चित्र आणि ध्रुव असे चार मार्ग आहेत. मार्ग तालाची ठेवण दर्शवितो.
  • क्रिया: क्रियेचे दोन प्रकार आहेत - सशब्द आणि निःशब्द
    • सशब्द क्रियेचे प्रकारः

ध्रुव, शंपा, ताल आणि सन्निपात

    • निःशब्द क्रियेचे प्रकारः

अवाप, विक्षेप, निष्काम आणि प्रवेशक

  • अंग: टाळ्या व काल ही तालाची अंगे आहेत. प्राचीन ग्रंथातून तालाचे स्वरूप अंगांनी दाखविले आहे. विराम,द्रुत, लघु, गुरू,प्लुत आणि काकपद ही तालाची अंगे आहेत. अंगे ही कालाच्या चौपटीत असतात. अंगे तालात किती टाळ्या व काल आहेत ते दर्शिवतात.
  • ग्रह: कोणत्या मात्रेपासून वाजविणे सुरू केले असता गाणे तालात व्यवस्थित बसेल ही माहिती ग्रह् अंगापासून मिळते.

ग्रह चार प्रकारचे आहेत - सम, विषम, अतीत व अनागत.

  • जाती:तालाच्या जाती ६ प्रकारच्या आहेत -
    • त्र्यस्त्र (मूळ लघु अंगाच्या .||| पट असणारे ताल)
    • चतुरस्त्र (मूळ लघु अंगाच्या १ पट असणारे ताल)
    • खंड (मूळ लघु अंगाच्या १| पट असणारे ताल)
    • मिश्र (मूळ लघु अंगाच्या १||| पट असणारे ताल)
    • संकीर्ण (मूळ लघु अंगाच्या २| पट असणारे ताल)
    • दिव्यसंकीर्ण (मूळ लघु अंगाच्या २||| पट असणारे ताल)
  • कला: वाद्य वाजवताना वा ताल हाताने दर्शविताना सहा प्रकारच्या मुद्रा बनतात त्या - वक्रा,कृष्णा, सर्पिणी, पद्मिनी, अपताका, कंपना, देवसंभवा व विसर्जिनी अशा आहेत.
  • लय:लय तालाचा वेग दर्शिविते. लय तीन प्रकारची असते - विलंबित, मध्ये व द्रुत
  • यती:"लयः प्रवृत्तीर्नियमो अतिरित्यभिधीयते"; यती लयीची ठेवण दर्शवितो. यती पाच प्रकारचे आहेत. - समा, स्त्रोतगता, गोपुच्छा मृदंगा व पिपिलिका
  • प्रस्तार:(Permutations) एका लघु अंगाची विविध रूपे.

उदा: ५ मात्र्यांच्या लघु अंगाची खालील प्रस्तर असू शकतील २+२+१ =५ १+१+३=५ ३+२=५ वगैरे

ताल सूची

पारंपारिक ग्रंथात १०८ तालांचा उल्लेख आहे. आज यातील केवळ १५ -२० ताल प्रामुख्याने वापरले जातात.

कर्नाटक ताल पद्धती ==जाती==

तीस्र जाती

चतस्र जाती

खंड जाती

मिश्र जाती

संकीर्ण जाती

ताल उपांग

कायदा

पेशकार

परण

त्रिपल्ली व तिहाई

सवाल जवाब

चक्रधार

तुकडा

ठेका

लडी

गत

रेला

संदर्भ

  1. ^ शास्त्रीय तबला गाईड - भास्कर गणेश भिडे - सन १९५९