Jump to content

तारामासा

तारामासा हा एक समुद्री जीव आहे.हयाला सी स्टार असे सुद्धा म्हणतात. याच्या शरीराचा आकार ताऱ्याच्या आकारासारखा असून तो पंचअरीय सममित असतो. हयांच्या रंगामध्ये फारच विविधता आढळते. पण तो कायमस्वरुपी टिकवल्यानंतर पिवळया किंवा तपकिरी रंगाचा दिसतो. हा विशेष करून भारत आणि अमेरिका या देशांलगत असलेल्या सागरी पाण्यात आढळतो.

संघ इकायनोडर्माटा

हे सर्व प्राणी फक्त समुद्रातच आढळतात.
हे प्राणी त्रिस्तरी आणि देहगुहायुक्त असून त्यांच्या प्रौढावस्थेत पंचअरिय सममिती आढळते परंतु त्यांच्या अळया द्विपाश्र्र्वसममित असतात.
ते नलिकापाद यांच्या साहाय्याने प्रचलन करतात, नलिकापादांचा उपयोग अन्न पकडण्यासाठी सुद्धा होतो. काही प्राणी स्थानबद्ध असतात.
हयांचे कंकाल कॅल्शियमयुक्त कंटकींचे किंवा पीकांचे बनलेले असते.
हे प्राणी बहुतेक एकल्ंिागी असतात.
उदाहरण : तारामासा , सीर्च्ािन, ब्रिटल स्टार, सी कंकूबर इत्यादी
स्टार मासाचा  शरीराच्या कातडीमध्ये पातळ कटिकल, एपिडर्मिस असतो ज्यामध्ये पेशींचा एकच थर असतो, जाड त्वचेवर ऊतक बनलेला असतो आणि पातळ कोयलॉमिक मायओइपीथेलियल थर असतो जेणेकरून यांना  गोलाकार स्नायू मिळतो .स्टार फीशची शरीर अवयव रचना जाळ्यापासून बनलेली एक हायड्रॉलिक प्रणाली आहे हे अवयव घटक अन्न आणि गॅस मध्ये अदलाबदल करण्यास मदत करते आणि या जीवांना गरजेचे पोषकतत्त्व मिळते.

[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ प्राण्यांचे वर्गीकरण[मृत दुवा].
  2. ^ [१][permanent dead link]