ताम्हिणी घाट
ताम्हिणी घाट महाराष्ट्रातील एक घाटरस्ता आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील माणगांव यांना जोडतो.सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर ताम्हिणी घाटाला आवर्जून भेट द्यायला हवी ती ताम्हिणी घाटाला. पावसाळ्यात येथील टेकड्या कात टाकतात. रूक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोट्याशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टींग) जोडही देता येते.
ताम्हिणी बुद्रुक हे गाव घाटमाथ्यावर आहे.