तामकडे
?तामकडे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पाटण |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
तामकडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस तर रात्री तापमान ११ अंश सेल्सियस असते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २२ अंश सेल्सियस असते. पावसाळ्यात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस तर रात्री तापमान २० अंश सेल्सियस असते.
लोकजीवन
तामकडे गावात शेती हा मुख्य व्यवसाय आहे,त्यात प्रामुख्याने भात ,ऊस,गहू,ज्वारी,मका,भुईमूग व इतर बरेच पिक घेतात गावातून महाराष्ट्राची जिवनवाहिनी कोयना नदी वाहते त्यामुळे परिसर सुजलाम सुजलाम आहे.गावात श्री अप्रांपुरी व निनाई देवीचे मंदिर असून घटस्थापना व गुडी पाडवा मुख्य उत्सव आहेत
प्रेक्षणीय स्थळे
तामकडे गावात पाहण्यासाठी गावातील श्री आप्रांपुरी व निनाई देवीचे मंदिर असून गुढीपाडवा व नवरात्र हे मुख्य उत्सव साजरा करण्यात येतात, व तामकडे गावाला समृद्ध कोयना नदी पात्र असून ते प्रेक्षणीय ठिकाण आहे व शेजारीच पाटण तालुक्यातील एकमेव तामकडे एम आय डी सी ही औद्योगिक वसाहत आहे व तिथे काही कंपनी आहेत. शेजारच्या येराड गावातील श्री येडोबा हे सुद्धा गावातील लोकांचे ग्रामदैवत आहे.