ताप
ताप | |
---|---|
वर्गीकरण व बाह्यदुवे | |
आय.सी.डी.-१० | R50 |
आय.सी.डी.-९ | 780.6 |
मेडलाइनप्ल्स | 003090 |
इ-मेडिसिन | med/785 |
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज | D005334 |
ज्या रोगामध्ये शरीराचे तापमान वाढते त्यास ताप असे म्हणतात. ताप हा एक रोगही आहे आणि एक लक्षणंही आहे. शरीरात जंतुसंसर्ग झाल्यास ताप येण्याची शक्यता असते. त्यामुळे ताप आल्यानंतर त्याचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. तापाचा उपचार हा दोन पद्धतीने करावा लागतो. १ - ताप कमी करणे २ - तापाचे कारण शोधून त्याचे निराकरण करणे.[ संदर्भ हवा ]
लहान मुले किंवा मोठी माणसे यांमध्ये ताप हा थर्मोमीटर ने मोजला जातो. थर्मोमीटर काखेत ठेवल्यानंतर जर ताप १००.४ पेक्षा जास्त असल्यास त्याला ताप असे म्हणले जाते. लहान मुलांमध्ये ताप आल्यावर झटके येण्याची शक्यता असते. तापासाठी पॅरासिटामोल औषध हे फार प्रभावी असते.[ संदर्भ हवा ]