तान्या दुबाश
भारतीय उद्योजिका | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | सप्टेंबर १४, इ.स. १९६८ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
शिक्षण घेतलेली संस्था | |||
व्यवसाय |
| ||
वडील | |||
आई |
| ||
भावंडे |
| ||
| |||
तान्या अरविंद दुबाश(जन्म १४ सप्टेंबर १९६८) ह्या गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रॅंड अधिकारी आहेत. सध्या त्या गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळात काम करतात. तान्या ह्या भारतीय महिला बँकच्या संचालक मंडळाचा सदस्य आहेत, तसेच त्या ब्राऊन विद्यापीठाचा विश्वस्तही आहेत. तान्या ह्या भारतातील उद्योगपती आदी गोदरेज यांची मोठी मुलगी आहे.[१]
शिक्षण
तान्याने ए.बी. ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजकारणातील पदवी प्राप्त केली आहे, तसेच हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून व्यवसाय व्यवस्थापनची पदवी घेतली आहे. २००७ मध्ये यंग ग्लोबल लीडर म्हणून त्तिला जागतिक आर्थिक मंचाने मान्यता दिली होती. ती ब्राउन विद्यापीठची ट्रस्टी आहे आणि ब्राउन - इंडिया सल्लागार परिषद सदस्य देखील आहे.[२]
गोदरेज ग्रुपमधील कारकीर्द
तान्या दुबाश गोदरेज ग्रुपच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रॅंड अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तसेच गोदरेज ग्रुपच्या विपणन कार्यक्रमाचा जबाबदार संचालक आहेत, ज्यामध्ये गोदरेज मास्टरब्रांडच्या विकासासाठी चालणाऱ्या विपणन ग्रुपचे नेतृत्व समाविष्ट आहे. सध्या ती नेचर बास्केट लिमिटेडची अध्यक्ष आणि गोदरेज रिमोट सर्व्हिसेस लिमिटेड आणि इन्सेम्बल होल्डिंग्ज अँड फायनान्स लिमिटेडची संचालक म्हणून कार्यरत आहे. गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड आणि गोदरेज एग्रोवेट लिमिटेड या संचालक मंडळाची ती संचालक आहे.
भारतीय महिला बँक
सार्वजनिक क्षेत्रातील ही पहिली बँक आहे, जिचा संचालक मंडळाचा सदस्य ह्या सर्व महिला आहेत. १९ नोहेंबर २०१३ साली या बँकेची स्थापना झाली. तान्या दुबाश या भारतीय महिला बँकच्या संचालक मंडळाचा सदस्य आहेत.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "The Godrej girls". dna (इंग्रजी भाषेत). 2010-03-24. 2018-08-04 रोजी पाहिले.
- ^ "The rise of Godrej girls: Nisaba to spearhead new Global Innovation Council at GCPL - Firstpost". www.firstpost.com. 2018-08-04 रोजी पाहिले.