तानाजी सावंत
तानाजी सावंत | |
मतदारसंघ | Yavatmal Local Authorities |
---|---|
मतदारसंघ | Paranda |
जन्म | १ जून १९६४ |
राजकीय पक्ष | Shiv Sena |
तानाजी सावंत हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक व्यावसायिक, शिवसेनेतील राजकारणी आणि उपनेते आहेत. शिवसेनेचे सदस्य म्हणून ते भूम/परंडा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत. [१] [२] ३४८ मते मिळवून ते २७० मतांच्या विक्रमी फरकाने विधान परिषदेवर निवडून आले. [३]
मे २०१६ मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या 'शिव जल क्रांती' योजनेचा एक भाग असलेल्या त्यांच्या जलसंधारण प्रकल्पामुळे ते प्रसिद्धीस आले. [४]
सावंत यांचा जन्म १ जून १९६४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव या गावी एका सामान्य शेतकरी कुटंबात झाला. सावंत यांनी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग मधून पदवी घेतली. त्यानंतर काही काळात त्यांनी पी.एच.डी देखील केली. सुरुवातीला त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली. लवकरच ते व्यावसायिक झाले. प्रथम त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी येथे भैरवनाथ खासगी साखर कारखाना उभारला. त्यानंतर काही काळात भैरवनाथ साखर कारखान्याचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात पाच युनिट सुरू केले. याशिवाय पुणे जिल्ह्यात त्यांनी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची (लघुरूप जे.एस.पी.एम.) स्थापना करून त्या अंतर्गत त्यांनी शाळा तसेच विविध शाखेतील शिक्षण देणारे महाविद्यालये सुरू केले.[५][६]
भूषवलेली पदे
- २०१६: शिवसेना उपनेते
- २०१६: महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले[७]
- २०१७: शिवसेना संपर्कप्रमुख उस्मानाबाद व सोलापूर जिल्हा नियुक्त[८]
- २०१९: महाराष्ट्र राज्य सरकारमधील जलसंधारण मंत्री[९]
- २०१९: महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले [१][२]
- २०२२: कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.[१०]
संदर्भ
- ^ a b "Paranda Vidhan Sabha constituency result 20019".
- ^ a b "Sitting and previous MLAs from Paranda Assembly Constituency".
- ^ "यवतमाळ विधानपरिषदेत शिवसेनेचे तानाजी सावंत ३४८ मते मिळवून विजयी". 2016-11-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-09-08 रोजी पाहिले.
- ^ "Shiv Jal Kranti water conservation project in Osmanabad completed".
- ^ "मी अंगठाछाप वाटतो का? असं ठणकावून विचारणारे तानाजी सावंत नेमकं शिकलेयत तरी कितवी ?". महाराष्ट्र टाइम्स. ७ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "तानाजी सावंत कोण आहेत, त्यांची राजकीय वाटचाल कशी आहे?". बी.बी.सी. मराठी. ७ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Team, DNA Web (2016-11-22). "BJP wins in MP, TMC in West Bengal, AIADMK sweeps TN & CPM wins in Tripura | Latest News & Updates at DNAIndia.com". DNA India (इंग्रजी भाषेत). 2021-05-13 रोजी पाहिले.
- ^ "सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली आगामी निवडणुका."
- ^ "मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप जाहीर".
- ^ "Maharashtra Live: Shiv Sena leaders Dada Bhuse, Gulabrao Patil sworn in as Cabinet ministers". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2022-08-09. 2022-08-09 रोजी पाहिले.