Jump to content

तस्लीमा नसरीन

तस्लीमा नसरीन
जन्म तस्लीमा
२५ ऑगस्ट, इ.स. १९६२
मैमेनसिंग, बांगलादेश
राष्ट्रीयत्वबांगलादेशी
नागरिकत्वबांगलादेशी, भारतीय, स्वीडिश
शिक्षण एम.बी.बी.एस.
प्रशिक्षणसंस्था मैमेनसिंग मेडिकल कॉलेज
पेशा वैद्यकीय, मानवतावादी
कारकिर्दीचा काळ १९७३ पासून
प्रसिद्ध कामे लज्जा (कादम्बरी
ख्याती मानवी हक्क, धर्मनिरपेक्ष चळवळी
पदवी हुद्दा डॉक्टर
धर्म मुस्लिम
जोडीदार रुद्र मोह्म्मद(१९८२-८६), नईमुल इस्लाम(१९८६-१९९१) मिनार महमूद(१९९१-१९९२)
वडील रजब अली
आई इदूल अरी
संकेतस्थळ
http://taslimanasrin.com/

तस्लीमा नसरीन (तसलिमा नासरीन) (बंगाली: তসলিমা নাসরিন ;) (२५ ऑगस्ट, इ.स. १९६२; मैमेनसिंग, बांगलादेश - हयात) ही बंगाली, बांगलादेशी डॉक्टर व लेखिका आहे. उदयोन्मुख लेखिका म्हणून इ.स. १९८० च्या दशकात तिची साहित्यिक कारकीर्द सुरू झाली. स्त्रीवादी विचारसरणीमुळे, तसेच धर्मावरील व विशेषकरून इस्लामावरील टीकेमुळे इ.स.च्या २०व्या शतकाच्या अखेरीस तिचे व्यक्तिमत्त्व व साहित्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चेचा विषय बनले. इ.स. १९९४मध्ये ती बांगलादेशातून परागंदा झाली व तिने भारतात आश्रय घेतला.

तसलिमा नासरीन यांनी लिहिलेली पुस्तके (बहुतेक इंग्रजी)

  • उधाणवारा (मूळ बंगाली, उतोल हवा, आत्मचरित्राचा २रा भाग)
  • ऑल अबाऊट वीमेन
  • द गेम इन रिव्हर्स
  • द्विखडित (आमार मेयेबेला खंड ३, मूळ बंगाली आत्मचरित्र; मराठीत 'माझं कुंवारपण'; अनुवादक - विलास गीते)
  • नष्ट मेयेर नष्ट गद्य (मूळ बंगाली; मराठी अनुवादक मृणालिनी गडकरी)
  • निर्बाचितो काॅलम (मराठी अनुवाद निर्बाचित कलाम; अनुवादक - )
  • निमंत्रण
  • नो कंट्री फाॅर वीमेन
  • फेरा (मूळ बंगाली; मराठी अनुवादक मृणालिनी गडकरी)
  • फ्रेंच लव्हर (मराठी अनुवाद - फरासि प्रेमिक; अनुवादक - सुप्रिया वकील)
  • मेयेबेला : माय बंगाली गर्लहुड
  • रिव्हेंज
  • लज्जा
  • लव्ह पोएम्स ऑफ तस्लीमा नसरीन
  • शेम
  • शोध
  • सिलेक्टेड काॅलम्स, वगैरे.

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "वूमेन्स अनटोल्ड स्टोरीज (बायकांच्या अ-कथित कथा) - तस्लीमा नसरीन हिची मायकेल डायबर्ट याने घेतलेली मुलाखत" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)